मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांची संपत्ती ईडीने जप्त केल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल (६ एप्रिल) दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यानंतर संजय राऊत यांनी देशाच्या स्वातंत्र्याचा नवीन लढा सुरू झाला आहे आणि त्यासाठी आम्ही बलिदान देण्यास तयार आहोत असे म्हटले. यावरच माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी ट्वीट करत राऊतांना डिवचले आहे.
“देशाच्या स्वातंत्र्यांचा नवा लढा सुरू, आम्ही बलिदान द्यायला तयार’ इति संजय राऊत. पण राऊत साहेब बलिदान नको, भ्रष्टाचार थांबवा आणि भ्रष्टाचार मुक्त इतकच महाराष्ट्रातील जनतेला स्वातंत्र्य द्या.”, असा टोला सदाभाऊ खोत यांनी लगावला आहे.
दरम्यान कालच संजय राऊत यांनी INS विक्रांतसंबंधी मोठा खुलासा करत भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले.आयएनएस विक्रांतसाठी किरीट सोमय्यांनी कोट्यवधी रुपये जमा केले. त्यासाठी लाखो लोकांनी पैसे दिले. स्वतः किरीट सोमय्यांनी 57 कोटी रुपये जमा केले. पण हे पैसे राजभवनात जमा झालेच नाहीत. असा आरोप राऊत यांनी केला आहे. यानंतर आता माजी सैनिक बबन भोसले यांनी बुधवारी उशिरा रात्री ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात किरीट सोमय्या यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर येत आहे.
महत्वाच्या बातम्या:
“असल्या वैचारिक लबाडीमुळेच काँग्रेस…”, भातखळकरांचा हल्लाबोल
“अच्छे दिनचे स्वप्न दाखवणारे मोदी सरकार…”, महागाईवरून महेश तपासेंचे टीकास्त्र
“मविआ सरकारने संजय राऊतांना स्वातंत्र्यसैनिक घोषित करून…”, भातखळकरांचे टीकास्त्र
“माझ्या पुतण्याला वाचवा” अश्या आर्त हाका काल दिल्लीत ऐकू आल्या; ‘मनसे’चा पवारांवर निशाणा
INS Vikrant : “लोकांनी आता गप्प बसू नये, जवानांचे शोषण करणाऱ्या…”, संजय राऊतांचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

