🕒 1 min read
मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांची संपत्ती ईडीने जप्त केल्यानंतर गुरुवारी (७ एप्रिल) दिल्लीहून ते मुंबईत येणार आहेत. शिवसेनेने त्यांच्या स्वागताची तयारी केली असून पक्षाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. संजय राऊत यांचे स्वागत मुंबई विमानतळापासून ते त्यांच्या भांडुपमधल्या घरापर्यंत केले जाणार आहे. यावरूनच भाजप नेते अतुल भातखळकर (atul bhatkhalkar) यांनी थेट महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.
“संजय राऊत आज दिल्लीहून मुंबईत येणार म्हणून शिवसेनेकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे अशी बातमी आहे. महाविकास आघाडी सरकारने संजय राऊत यांना स्वातंत्र्यसैनिक घोषित करून पेन्शन सुरू करावी. पद्म विभूषण पुरस्कारासाठी त्यांची केंद्राकडे शिफारस करायलाही हरकत नसावी.”, असा खोचक टोला भातखळकर यांनी ट्वीट करत लगावला आहे.
दरम्यान संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई करत त्यांची संपत्ती जप्त केली आहे. यामध्ये राऊत यांच्या अलिबागमधील आठ भूखंड आणि दादरच्या फ्लॅटचा समावेश आहे. एक हजार 34 कोटींच्या पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने ही कारवाई केली असल्याचे म्हटले जात आहे. तर दुसरीकडे भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर राऊत यांनी INS विक्रांत प्रकरणी मोठा खुलासा गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे.
महत्वाच्या बातम्या:
“माझ्या पुतण्याला वाचवा” अश्या आर्त हाका काल दिल्लीत ऐकू आल्या; ‘मनसे’चा पवारांवर निशाणा
INS Vikrant : “लोकांनी आता गप्प बसू नये, जवानांचे शोषण करणाऱ्या…”, संजय राऊतांचा इशारा
INS Vikrant : संजय राऊतांनी केलेल्या आरोपानंतर माजी सैनिकाची सोमय्यांविरोधात तक्रार दाखल
“अमेरिकेच्या कडेवरून उतरून पाकिस्तान रशियाच्या मांडीवर जाऊन बसल्यामुळे…”, राऊतांचे टीकास्त्र
World Health Day : गेल्या 8 वर्षांत वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात झपाट्याने बदल झाले- नरेंद्र मोदी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
