🕒 1 min read
मुंबई: कालचा (६ एप्रिल) दिवस म्हणजे मोठ्या घडामोडींचा दिवस ठरला. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी INS विक्रांतप्रकरणी मोठा खुलासा करत भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यापूर्वी संजय राऊतांची संपत्ती ईडीने जप्त केली. तर कालच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यासर्व पार्श्वभूमीवरून मनसे नेते संदीप देशपांडे (sandeep Deshpande) यांनी अप्रत्यक्ष शरद पवारांवर निशाणा साधत टोला लगावला.
“१७७३ साली ‘काका मला वाचवा’ अश्या आर्त हाका शनिवार वाड्यात लोकांनी ऐकल्या होत्या. थोड्याश्या वेगळ्या संदर्भात ‘माझ्या पुतण्याला वाचवा’ अश्या आर्त हाका काल दिल्लीत ऐकू आल्या.”, असे ट्वीट करत संदीप देशपांडे यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवारांना टोला लगावला आहे.
दरम्यान राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील तीन मोठ्या नेत्यांच्या इन्कम टॅक्स, ईडी आणि सीबीआय या केंद्रीय तपास यंत्रणांमार्फत चौकशा सुरू आहेत. अजित पवार, संजय राऊत आणि नवाब मलिक या नेत्यांवर छापे पडून त्यांच्या मालमत्ताही जप्त झाल्या. यासर्व पार्श्वभूमीवर शरद पवारांनी पंतप्रधानांशी चर्चा केली. संजय राऊत यांच्या मालकीची केवळ अर्धा एकर जमीन अलिबागमध्ये आहे. अशा क्षुल्लक कारणासाठी एका ज्येष्ठ पत्रकारावर केंद्रीय तपास यंत्रणांनी कारवाई करणे योग्य नसल्याचे शरद पवारांनी म्हटले.
दरम्यान आयएनएस विक्रांतसाठी किरीट सोमय्यांनी कोट्यवधी रुपये जमा केले. त्यासाठी लाखो लोकांनी पैसे दिले. स्वतः किरीट सोमय्यांनी 57 कोटी रुपये जमा केले. पण हे पैसे राजभवनात जमा झालेच नाहीत. असा आरोप राऊत यांनी केला आहे. यानंतर आता माजी सैनिक बबन भोसले यांनी बुधवारी उशिरा रात्री ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात किरीट सोमय्या यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर येत आहे.
महत्वाच्या बातम्या:
INS Vikrant : संजय राऊतांनी केलेल्या आरोपानंतर माजी सैनिकाची सोमय्यांविरोधात तक्रार दाखल
“अमेरिकेच्या कडेवरून उतरून पाकिस्तान रशियाच्या मांडीवर जाऊन बसल्यामुळे…”, राऊतांचे टीकास्त्र
World Health Day : गेल्या 8 वर्षांत वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात झपाट्याने बदल झाले- नरेंद्र मोदी
IPL 2022 KKR vs MI : पुण्यात पॅट पेटला..! मुंबईविरुद्ध कमिन्सची रेकॉर्डतोड फलंदाजी; नक्की वाचा!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
