Share

INS Vikrant : “लोकांनी आता गप्प बसू नये, जवानांचे शोषण करणाऱ्या…”, संजय राऊतांचा इशारा

Published On: 

मुंबई : आयएनएस विक्रांतसाठी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी कोट्यवधी रुपये जमा केले असून त्यासाठी लाखो लोकांनी पैसे दिले. स्वतः किरीट सोमय्यांनी ५६ कोटी रुपये जमा केले. पण हे पैसे राजभवनात जमा झालेच नाहीत. असा आरोप गंभीर आरोप काल (६ एप्रिल) प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आज देखील राऊतांनी सोमय्यांवर टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.

यासंदर्भात संजय राऊत यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘Mark my words, INS विक्रांत च्या नावे ५६ कोटी गोळा करून जनतेला देशाला फसवणाऱ्या सोमय्या बाप बेटा यांना जेलमध्ये जावेच लागेल. किरीट सोमय्या महाराष्ट्र द्रोही तर होतेच पण ते देशद्रोही असल्याचे आता उघड झाले आहे. लोकांनी आता गप्प बसू नये. जवानांचे शोषण करणाऱ्या bjp ला जाब विचाराच लागेल’, असे राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान, ‘विक्रांतशी देशातील नागरिकांच्या भावना जोडल्या गेल्या आहेत. ते देशाच्या संरक्षण शक्तीचे एक प्रतिक आहे. त्याच्यामध्ये जर घोटाळा होत असेल तर हा देशद्रोह ठरतो. त्यामुळे किरीट सोमय्या यांच्यावर देशद्राहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. सोमय्या यांनी भावनिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या देशाच्या नावाने गोळा केलेले पैसे यांनी गिळले. आम्ही पुरावा दिल्यावर म्हणता हा कसला पुरावा? लोकं तुला नागडं करून मारतील’, असे काल प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना संजय राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!