🕒 1 min read
मुंबई : मध्य प्रदेशात पुन्हा सत्तेत येण्याची वाट पाहणारी काँग्रेस आता सॉफ्ट हिंदुत्वाच्या वाटेवर आहे, मात्र या पक्षाला सुरुवातीपासूनच धक्के बसू लागले आहेत. प्रदेश काँग्रेसने आपल्या पदाधिकाऱ्यांना रामनवमी आणि हनुमान जयंती भव्य पद्धतीने साजरी करण्याच्या सूचना दिल्यावर पक्षाचे आमदार आरिफ मसूद यांनी यावर प्रश्न उपस्थित केला. राम आणि हनुमान यांच्यातील पार्टी रमजान का विसरली असा सवाल मसूद यांनी केला. दरम्यान, या मुद्द्यावरून आता भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी टीका केली आहे.
यासंदर्भात अतुल भातखळकर यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘राजकीय फायद्यासाठी हिंदुत्वाचे ढोंग रचून रामनवमी आणि हनुमान जयंती साजरी करणाऱ्या काँग्रेसचे वस्त्रहरण काँग्रेसच्याच आरिफ मसूद या आमदाराने “काँग्रेस रमजान का साजरा करत नाही?” असा मार्मिक प्रश्न विचारून केले आहे. असल्या वैचारिक लबाडी मुळेच काँग्रेस जनतेच्या मनातून साफ उतरली आहे’, असे भातखळकर म्हणाले.
दरम्यान, रामनवमी आणि हनुमान जयंती भव्य पद्धतीने साजरी करण्याचे पत्र प्रदेश काँग्रेसने सर्व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना पाठवले आहे. पत्रात म्हटले आहे की, रामनवमीच्या दिवशी कार्यकर्त्यांनी रामकथा, रामलीला आणि रामाच्या पूजेचे कार्यक्रम करावेत. तसेच हनुमान जयंतीला हनुमान चालीसा आणि सुंदरकांड पठण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रामनवमी १० एप्रिलला आहे तर हनुमान जयंती १६ एप्रिलला आहे. सर्व पक्षाचे जिल्हाध्यक्ष, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष, आमदार, माजी आमदार, लोकसभेचे उमेदवार आणि आघाडी-संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना या सूचनांचे पालन करण्यास सांगण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
- “अच्छे दिनचे स्वप्न दाखवणारे मोदी सरकार…”, महागाईवरून महेश तपासेंचे टीकास्त्र
- INS Vikrant : संजय राऊतांनी केलेल्या आरोपानंतर माजी सैनिकाची सोमय्यांविरोधात तक्रार दाखल
- INS Vikrant : “लोकांनी आता गप्प बसू नये, जवानांचे शोषण करणाऱ्या…”, संजय राऊतांचा इशारा
- “माझ्या पुतण्याला वाचवा” अश्या आर्त हाका काल दिल्लीत ऐकू आल्या; ‘मनसे’चा पवारांवर निशाणा
- “मविआ सरकारने संजय राऊतांना स्वातंत्र्यसैनिक घोषित करून…”, भातखळकरांचे टीकास्त्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
