मुंबई : घरगुती गॅस सिलेंडर महागला असून सर्वसामान्यांना महागाईचा चांगलाच फटका बसला आहे. फक्त इतकेच नाही तर पेट्रोल आणि डिझेलमध्येही दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. दरम्यान, याच मुद्द्यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी मोदी सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
यासंदर्भात महेश तपासे यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘गेल्या १६ दिवसांत देशामध्ये १४ वेळा पेट्रोल-डिझेलची दरवाढ झालेली आहे. “अच्छे दिन”चे स्वप्न दाखवणारे मोदी सरकार महागाईला रोखण्यात अकार्यक्षम ठरलेले आहे. एकीकडे गेल्या २ वर्षांपासून कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन सुरु असताना सर्व उद्योग व्यवसाय बंद होते. ज्यामुळे लोकांच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर घाट झाली. अशातच रशिया-युक्रेनचे युद्धही सुरु झाले. आणि अशा गंभीर परिस्थितीमध्ये पेट्रोल-डिझेलची दरवाढ केल्यामुळे देशातील एकूण महागाई वाढली, याचे केंद्र सरकारला भान राहिलेले नाही. ज्यावेळेस आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत कमी होती, त्यावेळेस सुद्धा मोदी सरकार देशाच्या जनतेला कोणत्याही प्रकारचा दिलासा देऊ शकलेले नाही.’
दरम्यान, पुढे ते म्हणाले की, ‘२०१७ मध्ये राजकीय पक्षांना वर्गणीसाठी इलेक्टोरल बॉण्डची योजना केंद्र सरकारने आणली होती. याचा गेल्या ४-५ वर्षांचा अहवाल पहिला, तर जवळपास सव्वा नऊ हजार कोटींचे इलेक्टोरल बॉण्ड वितरित झाल्याचे समजते. या सव्वा नऊ हजार कोटींच्या इलेक्टोरल बॉण्ड पैकी जवळपास ७५ ते ८० टक्के बॉण्ड हे वर्गणीच्या स्वरूपात भाजपला देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. यावरूनच देशातील जनता गरीब आणि भाजप मात्र अमीर झाल्याचे दिसून येते.’
महत्वाच्या बातम्या
- “अमेरिकेच्या कडेवरून उतरून पाकिस्तान रशियाच्या मांडीवर जाऊन बसल्यामुळे…”, राऊतांचे टीकास्त्र
- INS Vikrant : संजय राऊतांनी केलेल्या आरोपानंतर माजी सैनिकाची सोमय्यांविरोधात तक्रार दाखल
- INS Vikrant : “लोकांनी आता गप्प बसू नये, जवानांचे शोषण करणाऱ्या…”, संजय राऊतांचा इशारा
- “माझ्या पुतण्याला वाचवा” अश्या आर्त हाका काल दिल्लीत ऐकू आल्या; ‘मनसे’चा पवारांवर निशाणा
- IPL 2022: ‘जेव्हा ‘तो’ चांगला खेळतो तेव्हा मला माझ्या स्वतःच्या मुलाने परफॉर्म केल्यासारखे वाटते’; एमएसके प्रसादचे मोठे वक्तव्य


