🕒 1 min read
पुणे : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेचे नेते अमित ठाकरे हे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. ते विविध जिल्ह्यांचे दौरे करून तेथील नागरिकांशी आणि प्रामुख्याने महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. आज अमित ठाकरे हे पुण्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना “मी संजय राऊत यांची रिप्लेसमेंट नाही”, असं विधान त्यांनी केलं.
अमित ठाकरे म्हणाले, “सध्या मी राज्याचा दौरा करत आहे. प्रामुख्याने विद्यार्थ्यांसाठी फिरत आहेत. विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहे. त्यांचे प्रश्न जाणून घेऊन ते सोडवण्याकडे माझा कल असेल. सध्या त्यांना खूप समस्यांचा सामना करावा लागत आहे. रोजगार, आरक्षण आणि स्पर्धा परीक्षा यांसारख्या समस्या विध्यार्थ्यांपुढे आहेत. त्यामुळे असे प्रश्न सोडविण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयात मनविसेची शाखा असायला हवी, अशी आमची भूमिका आहे. तसेच माझा आणि विद्यार्थ्यांचा संपर्क व्हावा, मला त्यांच्याशी संवाद साधता यावा यासाठी मी हा दौरा करत आहेत.” तसेच “सध्याच राजकारण पाहता मी जर राज ठाकरेंचा मुलगा नसतो तर कधीच राजकारणात आलो नसतो.”, असं विधानही त्यांनी केलं.
यावेळी अमित ठाकरेंना पत्रकारांनी अनेक प्रश्न विचारले, ज्याची चपखल उत्तरं त्यांनी दिली. तसेच यावेळी एक पत्रकार अमित ठाकरेंना म्हणाले कि, तुम्ही जिथे हात तिथे बोलायला हवं. बातमी द्यायला हवी. त्यावर अमित ठाकरे स्मितहास्य करत म्हणाले कि, “ते सगळं संजय राऊत पुरवतात ना?” तर पत्रकार म्हणाले, ते सध्या तुरुंगात आहेत ना. त्यावर “मी काही संजय राऊत यांची रिप्लेसमेंट नाही बरं का.” असा मिश्किल टोला अमित ठाकरेंनी लगावला. तर त्यांच्या या विधानाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
महतवाच्या बातम्या:
- Elon Musk | एलोन मस्कने रिलीज केला ‘Sex Tape’, सोशल मीडियावर मजेदार पोस्ट व्हायरल
- Pankaja munde | वडिलांचा फोटो पाहताच पंकजा मुंडे भावुक, म्हणाल्या…
- Asaduddin Owaisi | भारत पाकिस्तान फाळणीला मुस्लीम जबाबदार नाहीत- असदुद्दीन ओवैसी
- Sonia Gandhi | सोनिया गांधी यांना दोन महिन्यांत दुसऱ्यांदा कोरोनाची लागण
- Ambadas Danve | “शिरसाट यांचं ट्विट रात्रीचंच, अब आगे आगे देखो…”- अंबादास दानवेंचा खोचक टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
