🕒 1 min read
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत सध्या मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात आहेत. कैदी क्रमांक ८९५९ अशी त्यांची ओळख आहे. १०३४ कोटींच्या पत्रा चाळ घोटाळ्यातील आरोपी संजय राऊत न्यायालयीन कोठडीत आहे. तुरुंगाच्या कोठडीत संजय राऊत यांची रोजचा दिनक्रम समोर आला आहे. यावरून ते तुरुंगात कोठडीची वेळ कशी घालवत आहेत, हे समोर आले आहे. तुरुंगात संजय राऊत आपला जास्तीत जास्त वेळ अभ्यास आणि लेखनात घालवतात. त्यांना कोणत्याही प्रकारची व्हीआयपी वागणूक देण्यात आलेली नाही.
संजय राऊत यांना सामान्य नियमांनुसार इतर कैद्यांना ज्या सुविधा दिल्या जातात त्याच सुविधा देण्यात आल्या आहेत. त्यांना लिहिण्यासाठी पेन आणि रजिस्टर देण्यात आले आहेत. मात्र ते लिखाण तुरुंगातून बाहेर जाऊ नये, तसेच कारागृहात काय लिहितात, याची पुरेपूर काळजी कारागृह प्रशासन घेत आहे. लिहिण्याव्यतिरिक्त ते बातम्या वाचतात. इतर कैद्यांप्रमाणे त्यांचा दिनक्रमही नियमांनी बांधलेला असतो.
संजय राऊत यांना घरचे जेवण आणि औषधे नेण्याची परवानगी-
न्यायालयाने संजय राऊत यांना घरचे जेवण आणि औषधे नेण्याची परवानगी दिली आहे. संजय राऊत आपला बराचसा वेळ एकांतात, अभ्यासात आणि लेखनात घालवतात. ते बहुतेक गप्प राहतात आणि कमी बोलतात. गेल्या रविवारी संजय राऊत यांचा लेख सामनामध्ये प्रसिद्ध झाला होता. यावर मनसेने प्रश्न उपस्थित केला होता. आता त्यांचे लिखाण तुरुंगातच बंदिस्त असावे, ते कोणत्याही प्रकारे तुरुंगाबाहेर जाऊ नये, याची कारागृह प्रशासन योग्य काळजी घेतली आहे.
संजय राऊत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीत –
संजय राऊत आर्थर रोड कारागृहात १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांना २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. ३१ जुलै रोजी ईडीच्या अधिकाऱ्यांचे एक पथक मुंबईतील मुलुंड येथील त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. पत्रा चाळ घोटाळा प्रकरणी साडेनऊ तास चौकशी केल्यानंतर संजय राऊत यांना ताब्यात घेण्यात आले होते. यानंतर त्यांना ईडीच्या मुंबई कार्यालयात आणण्यात आले. तेथे रात्री साडेदहा वाजेपर्यंत चौकशी सुरू होती. यानंतर रात्री उशिरा म्हणजे साडेबारा वाजता त्यांना अटक करण्यात आली. यानंतर विशेष न्यायालयाने त्यांना ऑगस्टपर्यंत आणि नंतर ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडीत पाठवले. यानंतर त्यांना २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
महत्वाच्या बातम्या :
- Amit Thackeray | “मी संजय राऊतांची रिप्लेसमेंट नाही”; अमित ठाकरेंचा मिश्किल टोला
- Elon Musk | एलॉन मस्कने रिलीज केला ‘Sex Tape’, सोशल मीडियावर मजेदार पोस्ट व्हायरल
- Pankaja munde | वडिलांचा फोटो पाहताच पंकजा मुंडे भावुक, म्हणाल्या…
- Asaduddin Owaisi | भारत पाकिस्तान फाळणीला मुस्लीम जबाबदार नाहीत- असदुद्दीन ओवैसी
- Sonia Gandhi | सोनिया गांधी यांना दोन महिन्यांत दुसऱ्यांदा कोरोनाची लागण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
