मुंबई : भारतीय क्रिकेटमधील बड्या स्टार खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपली ताकद दाखवूनच जागतिक क्रिकेटवर वर्चस्व गाजवले आहे. भारतातील कोणत्याही खेळाडूसाठी रणजी ट्रॉफी ही स्पर्धा खूप महत्त्वाची मानली जाते. सध्या रणजी ट्रॉफीचे बाद फेरीचे म्हणजेच उपांत्यपूर्व सामने खेळवले जात आहेत. मुंबई आणि उत्तराखंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या सामन्यात मुंबईच्या सुवेद पारकरने पदार्पणातच शानदार खेळी केली आहे. पहिल्याच सामन्यात या फलंदाजाने द्विशतक झळकावले.
नाणेफेक जिंकल्यानंतर मुंबईने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला मात्र त्याची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार पृथ्वी शॉ २१ धावा करून माघारी परतला तर दुसरा सलामीवीर यशस्वी जैस्वाल ३५ धावा करून बाद झाला. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या सुवेदने अरमान जाफरसह मुंबईचा डाव सांभाळला. अर्धशतक झळकावल्यानंतर जाफर बाद झाला, पण पदार्पण करणाऱ्या सुवेदने सरफराजसोबत २६७ धावांची अतुलनीय भागीदारी करत संघाला मोठी धावसंख्या गाठून दिली.
WICKET! Over: 166.4 Suved Parkar 252(447) Run Out Kunal Chandela, Mumbai 647/8 #MUMvCAU #RanjiTrophy #QF2
— BCCI Domestic (@BCCIdomestic) June 7, 2022
पदार्पणात द्विशतक
रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीत पदार्पण करणाऱ्या या फलंदाजाने १२३ चेंडूत पहिले अर्धशतक पूर्ण केले. यानंतर २०६ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकार ठोकत त्याने आपले प्रथम श्रेणीतील शतक पूर्ण केले. पण सुवेद इथेच थांबला नाही तर त्याने वैयक्तिक धावसंख्या दीडशेच्या पुढे नेली. २९० चेंडू खेळल्यानंतर सुवेदने कारकिर्दीतील पहिल्याच सामन्यात १५० धावांचा टप्पाही पार केला. यानंतर ३७५ चेंडू खेळत या तरुण खेळाडूने १७ चौकार आणि ३ षटकारांसह द्विशतक झळकावले.
नॉकआउट पदार्पणात द्विशतक
नॉक-आउट सामन्यात पदार्पण करताना द्विशतक झळकावणारा सुवेद हा रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील दुसरा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी १९९४ मध्ये अमोल मजुमदारने हरियाणाविरुद्ध द्विशतक झळकावून इतिहास रचला होता. सुवेद आता या यादीत सामील झाला आहे.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

