Share

Ranji Trophy 2022 QF : सरफराजचा अनोखा विक्रम! ७ वेळा शतकीय खेळींमध्ये ठोकल्या १५० पेक्षा जास्त धावा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुंबईचा मधल्या फळीतील फलंदाज सरफराज खानने रणजी ट्रॉफी २०२२ च्या दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीतील सामन्याच्या पहिल्या डावात चांगली खेळी केली आहे. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपली उत्कृष्ट कामगिरी सुरू ठेवली आहे. या खेळीच्या जोरावर सरफराज खानने प्रथम श्रेणी क्रिकेटच्या इतिहासात असा विक्रम केला जो त्याच्या आधी कोणत्याही खेळाडूच्या नावावर नव्हता.

सरफराज खानने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करत इतिहास रचला
सर्फराज खानने उत्तराखंडविरुद्धच्या या सामन्याच्या पहिल्या डावात २०५ चेंडूंचा सामना करत आणि ४ षटकार आणि १४ चौकारांच्या मदतीने १५३ धावांची शानदार खेळी खेळली. सरफराज खानचे हे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सातवे शतक होते. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्याने प्रत्येक वेळी शतक झळकावताना १५० हून अधिक धावा केल्या आहेत. सरफराज खान आता प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पहिला फलंदाज बनला आहे ज्याने आपल्या पहिल्या सात शतकांच्या खेळीत नेहमी १५० हून अधिक धावा केल्या आहेत.

सरफराज खानने गेल्या १३ डावांमध्ये ६ शतके झळकावली
सरफराज खानने प्रथम श्रेणी क्रिकेटच्या मागील १३ डावांमध्ये ६ शतके झळकावली आहेत. ज्यामध्ये एक तिहेरी शतक आणि दोन द्विशतके त्याच्या नावावर आहेत. त्याने शेवटच्या १३ डावात ७१, ३६, ३०१, २२६*, ७८, २५, १७७, ६, २७५, ६३, ४८, १६५, १५३ धावा केल्या आहेत. त्याच्या प्रथम श्रेणी क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने मागील २२ सामन्यांमध्ये (या सामन्यापूर्वीची आकडेवारी) ७७.७४ च्या सरासरीने २०९९ धावा केल्या आहेत. त्याने २२ सामन्यांत सहा शतकेही झळकावली आहेत. तर त्याच्या नावावर सहा अर्धशतकेही आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये नाबाद ३०१ ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!