🕒 1 min read
मुंबई : रणजी ट्रॉफी २०२२ (Ranji Trophy 2022 Final) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मध्य प्रदेशने ४१ वेळचा चॅम्पियन संघ मुंबईचा ६ गडी राखून पराभव केला आणि प्रथमच विजेतेपद पटकावण्याचे स्वप्न पूर्ण केले. आदित्य श्रीवास्तव मध्य प्रदेशचे कर्णधारपद सांभाळत असताना मुंबईची कमान पृथ्वी शॉकडे होती. पराभवानंतर पृथ्वीने आपल्या संघाचे कौतुक केले.
बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगलेल्या रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून पहिल्या डावात ३७४ धावा केल्या. यानंतर मध्य प्रदेशने ५३६ धावांची मोठी धावसंख्या उभारली. मध्य प्रदेशला विजयासाठी १०८ धावांचे लक्ष्य देताना मुंबईचा दुसरा डाव २६९ धावांत आटोपला. मध्य प्रदेशने २९.५ षटकात ४ गडी गमावून हे लक्ष्य साध्य केले आणि संघ प्रथमच चॅम्पियन बनला.
????????????????. ????. ????????????! ???? ????
Madhya Pradesh beat Mumbai by 6 wickets & clinch their maiden #RanjiTrophy title???? ???? @Paytm | #Final | #MPvMUM
Scorecard ▶️ https://t.co/xwAZ13D0nP pic.twitter.com/XrSp2YzwSu
— BCCI Domestic (@BCCIdomestic) June 26, 2022
विजेतेपदाच्या सामन्यातील पराभवानंतर पृथ्वी शॉ म्हणाला, ”आमच्या संघाने ज्या पद्धतीने खेळ केला, तो अविश्वसनीय होता. संघात अनेक नवीन खेळाडू आहेत आणि त्यांनी आपली प्रतिभा सिद्ध केली. मध्य प्रदेश संघ चांगला खेळला. मी जास्त वेळ फलंदाजी करू शकलो असतो, पण आलेख वर-खाली होत जातो. कदाचित या वर्षी नाही, पण पुढच्या वर्षी नक्की. तुम्ही आमच्या टीममधली प्रतिभा पाहू शकता – सरफराज खान, शम्स मुलानी, पारकर, अरमान जाफर हे भविष्य आहेत. प्रशिक्षक अमोल मजुमदार यांच्या मार्गदर्शनाखाली खेळण्याचा आम्हाला आनंद झाला.”
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
