मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी होताना दिसून येत आहेत. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांमुळे राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या बाजूने आपली ताकद दाखवत आहेत. काल शिवसैनिकांनी शिवसेना भवनाबाहेर गर्दी करत शक्ती प्रदर्शन केले. त्यानंतर सायंकाळी श्रीकांत शिंदे यांनी देखील ठाण्यात बंडखोर आमदारांच्या समर्थनार्थ शक्तिप्रदर्शन केलं. यानंतर आता या सर्व घडामोडींवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिलीय.
नाना पटोले म्हणाले कि, सध्या राज्यात सुरु असलेल्या घडामोडींमुळे संपूर्ण देशाचे लक्ष राज्याकडे लागले आहे. मात्र दिल्लीला हे महाग पडणार आहे. जेव्हा जेव्हा दिल्लीने राज्यावर नजर टाकली तेव्हा नाश झाला आहे. त्यामुळे याचे गंभीर परिणाम दिल्लीला भोगावे लागतील. त्यामुळे तमाशा थांबवा, असा इशारा पटोले यांनी दिला आहे.
तसेच ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्स हे भाजपचे तीन कार्यकर्ते आहेत. भाजप केंद्रातील सरकारच्या भरवश्यावर राष्ट्रपती राजवट लागू करू पाहत आहे. जर केंद्राने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली तर याचे गंभीर परिणाम त्यांना भोगावे लागतील, असा इशाराही नाना पटोले यांनी दिला.
महत्वाच्या बातम्या :


