🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्रात निर्माण झालेली राजकीय अस्थिरता थांबत नाही . शिवसेनेत उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटात सतत खडाजंगी होत आहे. बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून स्वतःला शिवसेनेचा विधिमंडळ पक्षनेता असल्याचे म्हटले आहे. शिवसेना विधिमंडळ पक्षनेतेपदावरून एकनाथ शिंदे यांची हकालपट्टी करण्याच्या निर्णयावर आक्षेप घेत एकनाथ शिंदे कोर्टात जाणार असल्याचं समजत आहे. अशातच आता शिवसेनेला धक्का देणारी अजून एक बातमी समोर येत आहे.
केंद्र सरकारने बंडखोर आमदारांना Y+ श्रेणीची सुरक्षा दिली आहे. बंडखोर आमदारांच्या सुरक्षेसाठी सीआरपीएफचे जवान सदैव तैनात असतील. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा झटका बसला आहे. आतापर्यंत उद्धव ठाकरे यांच्यासोबत उभे असलेले मंत्री उदय सामंतही एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल झाल्याचं समोर येत आहे.
“संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्या पोकळ आणि पुळचट धमक्यांना भीक न घालता मंत्री उदय सामंत गुवाहाटी ला रवाना . याला म्हणतात लायकी दाखवणं” अशा आशयाच ट्वीट भाजप आमदार राम सातपुते यांनी केल आहे.
संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्या पोकळ आणि पुळचट धमक्यांना भीक न घालता मंत्री उदय सामंत गुवाहाटी ला रवाना .
याला म्हणतात लायकी दाखवणं …@rautsanjay61 @Dev_Fadnavis— Ram Satpute (@RamVSatpute) June 26, 2022
सामंतांनी आपण मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख यांच्या पाठीशी ठाम असल्याचे यापूर्वी म्हंटल होतं. शिवसेना पक्षप्रमुखांनी आतापर्यंत जी जबाबदारी दिली व यापुढेही देतील ती आपण पार पाडणारं असल्याचेही सामंत दोन दिवसापूर्वी सांगितल होतं. मात्र आता या बातमीने राजकीय वातावरणात चांगलाच गदारोळ झालेला पाहायला मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
