मुंबई : काल रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात तब्बल पावणे दोन तास चर्चा झाली आहे. शिंदे-फडणवीस यांची ही बैठक अचानक आयोजित करण्यात आल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. मात्र ही चर्चा नेमकी कशाबद्दल झाली याची अद्याप माहिती समोर आलेली नाही.
शिंदे-फडणवीस यांची बैठकः
प्रभादेवीतील राड्यानंतर मुंबई शिवसेना विरुद्ध शिंदे गट हा संघर्ष ताणला जात आहे. अशातच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून शिंदे फडणवीस यांच्यात ही चर्चा झाल्याची शक्यता आहे. मात्र काही दिवसांपूर्वीच राज्यपालांनी ठाकरे सरकारच्या 12 आमदारांची यादी रद्द केली होती. त्यानंतर शिंदे फडणवीस कोणती बारा नावे आमदारकीच्या नियुक्तीसाठी पुढे देतात हा प्रश्न महत्वाचा असून याबाबत देखील चर्चा झाली असल्याची दाट शक्यता आहे.
शिंदे-फडणवीस कोणते 12 आमदार निवडणरः
शिंदे-फडणवीस कोणते 12 आमदार निवडणर याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. आज मंत्रिमंडळ बैठक पार पडणार आहे या मंत्रिमंडळ होणाऱ्या संभाव्य निर्णयाबाबतही बैठकीत चर्चा झाल्याची शक्यता आहे.
रात्री उशिरा देवेंद्र फडणवीस शिंदेच्या निवास्थानीः
दरम्यान, रात्री उशिरा देवेंद्र फडणवीस शिंदेच्या निवास्थानी वर्षावर गेले होते. तिथे अचानक बैठक झाली असून पावणे दोन तास ही बैठक झाल्याने राजकीय चर्चेंना उधाण आलं आहे.
महत्वाच्या बातम्याः
- Shahajibappu Patil | “आमचा धंदाच चकवा देण्याचा आहे”
- Sharad Pawar | शरद पवारांच्या एन्ट्रीवर वाजलं अजीम-ओ-शान-शहंशा गाणं अन् भाजपना सोडला टीकेचा बाण
- Chandrasekhar Bawankule | पुढचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण हवेत? ; चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं मोठं वक्तव्य
- Sanjay Kute | “काही दिवसांनी नाना पटोलेच भाजपमध्ये येतील…”; संजय कुटे
- PAK VS SL । श्रीलंकेने आशिया कप फायनलमध्ये पाकिस्तानवर मिळवला दणदणीत विजय, सहाव्यांदा ट्रॉफी जिंकली


