🕒 1 min read
सोलापूर : एकनाथ शिंदे यांनी भाजप पक्षासोबत युती करून राज्यात सरकार स्थापन केलं. त्यावेळी त्यांनी काही आमदारांना गुवाहटीला नेलं होतं. त्या काळात शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांचा काय झाडी, काय डोंगर, काय ते हॉटेल हा डायलॉग खूप गाजत होता. तेव्हापासून त्यांच्यावर टीका करताना विरोधी पक्षनेत्ये याच डायलॉगचा वापरत करत असतात. अशातच पुन्हा एकदा आपल्या गमतीदार बोलीमुळे शहाजीबापू पाटील चर्चेचा विषय बनले आहेत.
काय म्हणाले शहाजीबापू पाटील ?
आमचा धंदाच चकवा देण्याचा आहे, असं शहाजीबापू यांनी म्हटलं आहे. सांगोला येथील बास्केटबॉल स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला शहाजीबापू यांना बोलवण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. चकवा योग्य बसला तर अंगावर गुलाल पडतो. मात्र, चकवा हुकला तर पाच वर्षे घरी बसावं लागतं, हे आमचं दु:ख असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
आज इथे समोर बघताना मला माझ्या कॉलेज जीवनाची आठवण झाली. मी कॉलेजला असताना तिथे ग्रामीण आणि शहरी भागातील मुलं मुली होते. तिथे सातारा सैनिक स्कूलमधून शिकून आलेल्या पोरांची वेगळीच फळी होती. ही पोरं सर्वच वर्गात असायची. हॉकी, फुटबॉल आणि बास्केटबॉलसारखे खेळ फक्त सैनिकी स्कूलमधून आलेली पोरंच खेळायची. आम्ही मात्र कबड्डी, खो-खोसारखे गावरान खेळ खेळायचो, असं सांगत शहाजी बापू पाटील यांनी आपल्या कराड येथील कॉलेज जीवनातील आठवणींना उजाळा दिला.
पुढे ते असंही म्हणाले की. ही तरुणाई पाहिल्यानंतर, मनात कधी कधी विचार येतो की, देवानं इतक्या लवकर मला म्हातारं का केलं?अजून तरुण असतो तर बरं झालं असतं
महत्वाच्या बातम्या :
- Shivsena | “महाराष्ट्राची सत्ता ओरबाडून घेतल्यावर तरी भाजपचा आत्मा शांत होईल असे वाटले होते; पण…”; शिवसेनेचा हल्लाबोल
- Navneet Rana | नवनीत राणा यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद
- Aditya Thackeray । कदम पिता-पुत्रांचा आदित्य ठाकरे घेणार समाचार; दापोलीत १६ सप्टेंबरला ‘निष्ठा यात्रा’
- Ajit Pawar | आजित पवार पुन्हा नाराज! दोन वेळा सभागृह सोडून गेल्याने चर्चेंना उधाण
- Shivsena Vs Shinde: दादर राड्याप्रकरणी जामीन मिळालेल्या 5 शिवसैनिकांचं मातोश्रीवर कौतुक, उद्धव ठाकरे म्हणाले..
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
