Share

Devendra Fadnavis | शिवसेनेतील बंडावर देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य! म्हणाले, एक व्यक्ती जबाबदार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेतील बंडावर मोठं वक्तव्य केलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री राहिलेल्या फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. शिवसेनेतील बंडावर फक्त एकच व्यक्ती जबाबदार आहे आणि ती म्हणजे उद्धव ठाकरे, असे ते म्हणाले. उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीला देखील त्यांनी जबाबदार धरले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर विश्वास ठेवणे ही त्यांची सर्वात मोठी राजकीय चूक असल्याचेही ते म्हणाले.

मुंबईतील एका कार्यक्रमादरम्यान फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करताना राज्यातील अलीकडच्या राजकीय घडामोडींसाठी उद्धव ठाकरेंना जबाबदार धरले पाहिजे, असे सांगितले. फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रातील राजकीय संकटाला फक्त उद्धव ठाकरेच जबाबदार आहेत. शिवसेनेच्या फुटीला त्यांची कार्यशैली कारणीभूत आहे. सुमारे 30-40 आमदारांनी महाविकास आघाडी सोडली आणि त्यांना याची कल्पना नव्हती.

आणि नेमके तेच झाले-

फडणवीस म्हणाले, “उद्धवजी त्यांच्या भाषणात म्हणायचे, ‘तुम्ही माझे सरकार पाडण्याचा प्रयत्न करू शकता’. मी म्हणालो, ‘एक दिवस तुमचे सरकार पडेल आणि तुम्हाला ते कळणारही नाही’ आणि नेमके तेच झाले.

शिवसेना आमदारांनी केले होते बंड-

राज्यात सुमारे 40 शिवसेना आमदारांनी बंड केले होते, त्यानंतर राज्यातील MVA (शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस) सरकार अल्पमतात आले. यानंतर शिंदे गटाच्या बंडखोर आमदारांनी भाजपच्या मदतीने सरकार स्थापन केले. त्यानंतर ३० जून रोजी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!