टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती थांबताना दिसत नाहीये. आता पवार कुटूंबाचे नातेवाईक आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस नेते आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी राष्ट्रवादीला रामराम करण्याची घोषणा केली आहे. उस्मानाबाद येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेत पाटील यांनी घोषणा केली आहे. राणाजगजितसिंह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं यामुळे स्पष्ट झाले आहे.
यावेळी राणा पाटील म्हणाले की, उस्मानाबादसाठी पाटील घराण्याने भरपूर केले आहे, हे जिल्हावासीयांना माहीत आहे. त्यामुळे काळजावर दगड ठेवून मी पक्षांतराचा निर्णय घेतला आहे. सबका साथ, सबका विकास’च्या प्रवाहात जिल्हा मागे राहू नये यासाठी पक्षांतर करत असल्याचं राणा पाटील म्हणाले. तसेच शरद पवार हे आपले दैवत आहे, या पुढेही राहिल, असेही राणा पाटील म्हणाले.
राणाजगजितसिंह हे माजीमंत्री पदमसिंह पाटील यांचे चिरंजीव आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली होती, शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता.मात्र आता खुद्द राणा पाटील भाजपमध्ये जाऊ इच्छित आहेत. आणि त्या बाबतची घोषणा देखील राणा पाटील यांनी केली आहे.
गेले अनेक दिवस राणा जगजितसिंह पाटील हे भाजप नेत्यांच्या संपर्कात आहेत. तर मतदारसंघातही राणा पाटील यांच्या पक्षांतराची चर्चा होती. त्यामुळे इतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांप्रमाणे राणा पाटील यांनी देखील भाजपच्या विजयी गंगेत उडी मारली आहे. मात्र याचा फटका राष्ट्रवादी कॉंग्रेसला बसणार आहे. राणा पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पारंपारिक उमेदवार होते. त्यामुळे राणा पाटील यांचा भाजप प्रवेश हा राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या जिव्हारी लागणार असल्याचं सांगितल जात आहे.
- आरक्षणामुळे गुणवत्तेची हत्या ! बीडवासियांनी आरक्षणा विरोधातचं काढला मूकमोर्चा
- न्यायालयाचा शंकरराव गडाखांना दिलासा, आंदोलन प्रकरणी जामीन मंजूर
- उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादीला खिंडार, राणा पाटलांनी केली भाजप प्रवेशाची घोषणा
- वंशाच्या दिव्यापेक्षा मुलीच बऱ्या ;सुप्रिया सुळेंंचा राणा पाटलांना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
