🕒 1 min read
मुंबई : राणा दाम्पत्यांचा जीमिनावरील सुनावणी पूर्ण झाली आहे. पण निकाल सोमवारी देण्यात येणार आहे. न्यायालयाने हा निकाल राखून ठेवलाय. हा निकाल सोमवारी लागणार आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा गेल्या अनेक दिवसांपासून जेलमध्ये आहेत. आज कोर्टात वकिलांमध्ये घमासान युक्तिवाद झाल्याची माहिती समोर येत आहे. राणा यांच्या वकिलाने सुनावणी दरम्यान सांगितले की, राणा दाम्पत्य हे निवडून आलेले नेते असून ते कुठेही पळून जाणार नाहीत. त्यामुळे त्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेऊ नये. दोघांना ८ वर्षांची मुलगी आहे. दोघांवर काही अटी लादल्या जाऊ शकतात. पण त्यांना जमीन मंजूर केला पाहिजे, अशी मागणी त्यांच्या वकिलाने केली. पण आता समोर आलेल्या माहितीनुसार त्यांच्या जामिनीवरील सुनावणी सोमवारी केली जाईल.
नवनीत राणा व रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. हनुमान चालीसा पठण नंतर राज्य सरकारच्या यंत्रणेलाच आव्हान दिल्याच्या आरोपाखाली भारतीय दंड संहितेतील १२४-अ हे राजद्रोहाचे कलम लावण्यात आले.
राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यांना आता सोमवारच्या निकालाची वाट पाहायला लागणार आहे. तोपर्यंत त्यांना कोठडीतच राहावे लागणार आहे. राणा दाम्पत्याला शनिवारी अटक करण्यात आली होती. त्यानंतर रविवारी त्यांना न्यायालयात हजार करण्यात आले होते. पोलिसांनी विविध मुद्द्यांवर पोलीस कोठडीची मागणी केली होती. त्यानंतर आता राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. राणा दाम्पत्याकडून जामिनासाठी अर्ज केला गेला होता. पण न्यायालयाने तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला होता. आता जामिनावर सुनावणी पूर्ण झाली असली तरी निकाल सोमवारी येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
