Share

राज ठाकरेंच्या ताफ्यात अपघात, अंकुश चौधरी आणि केदार शिंदे थोडक्यात बचावले!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्याच्या सभेसाठी औरंगाबादकडे निघाले आहेत. ३० ते ४० गाड्यांचा ताफा घेऊन राज ठाकरे औरंगाबादच्या दिशेने रवाना झाले आहेत. पण त्यांचा ताफ्यातील गाड्यांचे अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. या अपघातात सात आठ गाड्या एकमेकांवर आदळल्याने गाड्यांचे मोठे नुकसान झाले. या अपघातात दिग्दर्शक केदार शिंदे आणि अभिनेता अंकुश चौधरी यांच्या गाड्यांचेही अपघात झाले आहे. त्यांच्या गाड्यांचेही नुकसान झाले आहे.

दिग्दर्शक केदार शिंदे आणि अभिनेता अंकुश चौधरी सुखरूप आहेत. या अपघातात केदार शिंदे, अंकुश चौधरी यांना कसली इजा झाली नसली तरी त्यांच्या गाड्यांचे नुकसान झाले आहे. काळजी करण्याचे कसलेही कारण नाही, असे अंकुश चौधरी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

विशेष म्हणजे, आज हा ताफ्याचा दुसरा अपघात आहे. पुण्यावरून येताना काही गाड्या एकमेकांवर आदळल्या होत्या. त्यानंतर हा अपघात घडून आला. पुण्यावरून निघाल्यानंतर या सर्व गाड्या हायवेवरून अतिशय वेगाने येत होत्या. औरंगाबाद पासून अगदी २० किलोमीटर अंतरावर असताना या गाड्यांचा अपघात झाला. समोरच्या गाड्यांनी एकदमच ब्रेक मारल्याने पाठीमागून येणाऱ्या गाड्या एकमेकांवर आदळल्या. यामुळे हा अपघात घडून आला.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!