Share

IPL 2022 RR vs MI : ‘बर्थडे बॉय’ हिटमॅननं जिंकला टॉस; मुंबई संघातून ‘बेबी एबी’ OUT!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स (RR vs MI) यांच्यात आज डबल हेडरचा दुसरा सामना रंगत आहे. डी वाय. पाटील स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्यात मुंबईचा कप्तान आणि ‘बर्थडे बॉय’ रोहित शर्माने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. राजस्थान आठपैकी सहा सामने जिंकून गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. तर मुंबई इंडियन्स आठही सामने गमावून तळाशी आहे. या मोसमातील दोन्ही संघांचा हा दुसरा सामना आहे.

राजस्थान रॉयल्सने शेवटच्या सामन्यात आरसीबीचा पराभव करत मोठा विजय नोंदवला. या हंगामात संघाने सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. जोस बटलरचा फलंदाजीतील फॉर्म उत्कृष्ट आहे आणि त्याने या मोसमातील तीन शतकांपैकी एक केवळ मुंबईविरुद्धच झळकावले. गेल्या सामन्यात रियान परागची बॅटही चांगली तळपली होती.

दुसरीकडे मुंबई इंडियन्सच्या योजनेनुसार आतापर्यंत काहीही झालेले नाही आणि संघाचे अपयश मुख्यत्वे त्याच्या मोठ्या खेळाडूंच्या निराशाजनक कामगिरीमुळे झाले आहे. इशान किशन, रोहित शर्मा आणि कायरन पोलार्ड फलंदाजीत अपयशी ठरले आहेत. जसप्रीत बुमराहही गोलंदाजीत विकेट घेण्यात अपयशी ठरला आहे.

दोन्ही संघांची Playing 11

राजस्थान रॉयल्स – जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सैमसन (यष्टीरक्षक/कप्तान), डॅरिल मिशेल, शिमरोन हेटमायर, रियान पराग, रवीचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, युजवेंद्र चहल, कुलदीप सेन.

मुंबई इंडियन्स – इशान किशन (यष्टीरक्षक), रोहित शर्मा (कप्तान), टिम डेविड, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, कायरन पोलार्ड, ऋतिक शोकीन, डेनियल सॅम्स, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, रिले मेरेडिथ.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!