Share

“राज ठाकरे स्वतःला बाळासाहेब ठाकरेच समजू लागलेत”; उद्धव ठाकरेंचा घणाघात

Published On: 

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. “राज ठाकरे हे आपण जणू बाळासाहेब ठाकरेच आहोत, असं समजू लागले आहेत,” असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. तसेच राज ठाकरे हे भाजपाची ‘बी’ टीम नव्हे तर ‘ढ’ टीम आहे, असा जोरदार टोलाही लगावला.

उद्धव ठाकरे यांनी काल शुक्रवारी रात्री खासदारांची बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. शिवसंपर्क अभियानाच्या पहिल्या टप्प्यातील अनुभवही त्यांनी ऐकून घेतले आणि पुढील टप्प्यासाठी सूचना केल्या. तसेच “राज ठाकरे हे भाजपाची बी टीम नव्हे तर ढ टीम आहे. मुन्नाभाई चित्रपटात मुन्नाभाईला गांधीजी वाचून वाचून आपणच गांधींसारखे बोलू शकतो असा भ्रम होतो, तसेच हे राज ठाकरे हे आपण जणू बाळासाहेब ठाकरेच आहोत असे समजू लागले आहेत”, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंवर केला.

“मराठवाडा हा एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला होता. त्याठिकाणी येत असलेली राजकीय आव्हाने आणि बदललेली परिस्थिती लक्षात घेऊन पक्षसंघटना अधिक बळकट करण्याची गरज आहे. पश्चिम विदर्भातही पक्षसंघटना बळकट करण्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल, असे ठाकरे यांनी सांगितले. त्याचबरोबर शिवसंपर्क अभियानाचा दुसरा टप्पा २६ ते २९ मे याकाळात राबवण्यात येणार असून त्याकाळात कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात लोकांपर्यंत जायचे आहे. या ठिकाणीही सरकारच्या कामांचा उपयोग पक्षवाढीसाठी करायचा आहे”, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!