🕒 1 min read
मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022)च्या ३७व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सचा (LSG vs MI) ३६ धावांनी पराभव केला. या सामन्यात पुन्हा एकदा मुंबईचे फलंदाज चांगले खेळू शकले नाहीत. यात कायरन पोलार्डचाही समावेश आहे. २० चेंडूत १९ धावा करून तो बाद झाला. सामन्याच्या शेवटच्या षटकात कृणाल पंड्याने (Krunal Pandya) पोलार्डला बाद केले. कृणालने पोलार्डची विकेट घेताच मैदानावर एक मजेदार घटना घडली.
शेवटच्या ६ चेंडूत मुंबईला विजयासाठी ३९ धावांची गरज होती. कृणालच्या पहिल्याच चेंडूवर पोलार्डने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू पूर्णपणे बॅटवर आला नाही आणि डीप मिडविकेटवर उभ्या असलेल्या दीपक हुडाने त्याचा झेल घेतला. पोलार्डला बाद केल्यानंतर कृणाल इतका आनंदी झाला, की त्याने पोलार्डच्या डोक्याचे चुंबन घेतले.
https://twitter.com/kinggkohlii18/status/1518472267508109312
पोलार्डला त्याला कृणालची ही कृती आवडली नाही. तो कोणतीही प्रतिक्रिया न देता पॅव्हेलियनमध्ये परतला. सामन्याच्या शेवटच्या षटकात कृणालने डॅनिअल सॅमची विकेट घेतली तसेच पोलार्डलाही बाद केले. त्याच्या षटकात जयदेव उनाडकटही धावबाद झाला. याआधी सामन्यात पोलार्डने कृणालला बाद करून मजेदार प्रतिक्रिया दिली होती. आयपीएल २०२२मध्ये कायरन पोलार्डची कामगिरी काही विशेष झाली नाही. या वर्षात त्याला एकही अर्धशतक ठोकता आलेले नाही.
https://twitter.com/cric_big_fan/status/1518289513113522177?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1518289513113522177%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news18.com%2Fnews%2Fsports%2Fcricket-ipl-2022-lucknow-super-giants-krunal-pandya-sends-off-mumbai-indians-kieron-pollard-with-a-kiss-4213821.html
कृणाल आणि पोलार्ड गेल्या मोसमापर्यंत मुंबई इंडियन्सकडून खेळायचे. दोघांनी मुंबईला अनेक प्रसंगी संस्मरणीय विजय मिळवून दिले आहेत. पण आयपीएल २०२२ पूर्वी मुंबईने पोलार्डला कायम ठेवले होते. त्याचवेळी हार्दिक आणि कृणाल यांना रिलिज करण्यात आले. हार्दिक या हंगामात गुजरात टायटन्सचा कर्णधार आहे. तर कृणाल लखनऊकडून खेळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
