Share

राणा दाम्पत्य दिल्लीकडे रवाना; अमित शाहांची घेणार भेट

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: ठाकरे सरकारने माझ्यावर अन्याय, अत्याचार केला. माझ्यावरील अन्यायाचं उत्तर महाराष्ट्रातील जनता ठाकरे सरकारला नक्की देईल. हनुमान चालिसा म्हणणं हा जर गुन्हा असेल तर १४ दिवसच काय, १४ वर्ष तुरुंगात राहायला तयार आहे. राम आणि हनुमानाचं ठाकरे सरकारला काहीही पडलेलं नाहीये. प्रभू राम आणि हनुमानाच्या नावावर ठाकरे सरकारने माझ्यावर अन्याय केलाय. असा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे. या पाश्वर्भूमीवर आता राणा दाम्पत्य यांनी दिल्लीची वाट पकडली आहे.

या सगळ्याची तक्रार आम्ही दिल्लीत जाऊन करणार असल्याचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी सांगितले. नवनीत राणा आणि रवी राणा यांनी दिल्लीला जाण्यापूर्वी आज सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिसांचे पथक तपासणीसाठी आमच्या घरी पाठवले होते. उद्धव ठाकरे यांनी खुशाल आमच्या घराची ऑनलाईन पाहणी करावी. माझा मुंबईत एकच फ्लॅट आहे. उद्धव ठाकरे यांना माझ्या घराची पाहणी करायची असेल तर रिकामटेकडे बसलेल्या संजय राऊत आणि अनिल परब यांनाही माझ्या घराची पाहणी करण्यासाठी पाठवावे आणि घराचा प्रत्येक कोपरा तपासावा”, असे रवी राणा यांनी म्हटले.

“सकाळी पाच वाजेपर्यंत आम्हाला पाणी आणि सतरंजीही देण्यात आली नव्हती. पोलिसांनी आम्हाला व्यवस्थित वागणूक दिली नाही. आम्ही दिल्लीत जाऊन मुंबई पोलीस आणि संजय राऊत यांची तक्रार करणार आहोत. नवनीत राणा आणि रवी राणा दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि लोकसभेचे अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांना भेटणार आहेत. देशाचे गृहमंत्री महिलांचा आदर करणारे आहेत. ते आमची तक्रार ऐकून घेतील, असा विश्वास आम्हाला आहे. राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या दडपशाहीची आम्ही तक्रार करणार. आम्ही दिल्लीत या सगळ्याचा पाठपुरावा करत राहू”, असेही त्यांनी म्हटले.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!