मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी ट्वीट करत भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांच्यावर पुन्हा एकदा आरोप केले आहेत. किरीट सोमय्यांच्या युवक प्रतिष्ठान कंपनीबाबत संजय राऊत (sanjay raut) यांनी काही धक्कादायक दावा करत आरोप केले आहेत.
“ही खंडणी नाही का? ईडी, सीबीआय, आयकर विभाग, सेबी च्या रडारवर असलेल्या कंपन्यांकडून किरीट सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला कोट्यवधींचा निधी कसा काय मिळाला? हा काळा पैसा पांढरा करण्याचा घाणेरडा डाव तर नाही ना? हिसाब तो देना होगा. मी चॅरिटी कॉमर्स आणि तपास यंत्रणांकडे तक्रार दाखल केली आहे.”, असे ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे.
Kirit ka Kamal!
2013-14:
Kirit makes allegations agnst a company2016:
Company Chief is probd by @dir_ed2018-19:
Yuvak Pratishthan gets HUGE donation frm d Very SAME compny.Aap Chronology samjhiye!
BTW,Isn't ths a case of ED & EOW invstgatn?
I wil file a complnt soon! pic.twitter.com/hpFMTaeUFG
— Sanjay Raut (@rautsanjay61) May 9, 2022
Isn't ths EXTORTION?
How come Kirit Somaiya's Yuvak Pratishthan gets Donations worth crores frm comps. tht r on ED,CBI,IT,SEBI radar?
OR,is it a dirty game of turning Black money to white?
Hisab toh Dena hoga,Bhai!
I hv alrdy filed a complnt wth Charity Commsnr & inv agencs pic.twitter.com/olYADmP67g
— Sanjay Raut (@rautsanjay61) May 8, 2022
तसेच दुसऱ्या ट्वीटमध्ये संजय राऊत यांनी म्हटले की, “किरीट का कमाल! वर्ष 2013-14 मध्ये किरीट यांनी एका कंपनीविरोधात आरोप केले होते. त्यानंतर कंपनीच्या प्रमुखाची ईडीने चौकशीदेखील केली. त्यानंतर 2018-19 मध्ये सोमय्या यांच्याशी संबंधित युवक प्रतिष्ठानला याच कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर निधी मिळाला. क्रोनोलॉजी समजिए”, असे ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “…वारसदार म्हणणाऱ्यांनी हिंदुत्वासाठी एक भरीव काम केल्याचे उदाहरण सांगावे”, ‘मनसे’चे शिवसेनेला आव्हान
- “भाऊरावांनी केवळ क्रमिक शिक्षणच नव्हे, तर…”, छगन भुजबळांनी ट्वीट करत केले अभिवादन
- “…प्रवृत्तीस बळ देणारे एक दिवस याच मातीत मिसळतील”, पंजाबमधील ‘त्या’ घटनेवर संजय राऊतांचा इशारा
- IPL 2022 CSK vs DC : चेन्नईचा दिल्लीवर ‘सुपर’ विजय; तब्बल ९१ धावांनी पाजलं पराभवाचं पाणी!
- IPL 2022 CSK vs DC : गायकवाड-कॉनवेची सुरुवात आणि धोनीचा फिनिशिंग अंदाज..! चेन्नईचा दिल्लीसमोर २०८ धावांचा डोंगर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

