Share

“…वारसदार म्हणणाऱ्यांनी हिंदुत्वासाठी एक भरीव काम केल्याचे उदाहरण सांगावे”, ‘मनसे’चे शिवसेनेला आव्हान

Published On: 

मुंबई: राज्यात सध्या अयोध्या दौरा सर्वाधिक चर्चेत आहे. मंत्री आदित्य ठाकरे १० जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. तर दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचाही अयोध्या दौरा असणार आहे. मात्र त्यापूर्वीच अयोध्येत शिवसेनेकडून पोस्टरबाजी करण्यात आली आहे.  यामधून राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवरच औरंगाबाद मनसेचे जिल्हा अध्यक्ष सुमित खांबेकर (Sumit Khambekar) यांनी शिवसेनेला आव्हान दिले आहे.

“स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर स्वतःला वारसदार म्हणणाऱ्यांनी हिंदुत्वासाठी एक भरीव काम केल्याचे उदाहरण सांगावे, जमत नसेल तर मनसेचे उदाहरणे आम्ही देतो म्हणजे सच्चा कोण हे लोकांना कळेल.”, असे ट्वीट सुमित खांबेकर यांनी केले आहे. सोबतच त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना ते टॅग केले आहे.

दरम्यान ‘असली येत आहे, नकली पासून सावधान’, अशा शब्दांमध्ये शिवसेनेने राज ठाकरेंवर पोस्टरमधून निशाणा साधला आहे. तर राज ठाकरे 5 जूनला अयोध्येला जाणार आहेत. मनसेकडून त्यासाठी जोरदार तयारी करण्यात येत आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी आदित्य ठाकरे हे देखील अयोध्याला जाणार असल्याची माहिती दिली होती. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना-मनसे संघर्ष बघण्यास मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!