Share

“ठाकरे सरकारकडे फक्त आम्हाला अडचणीत आणण्यासाठी वेळ” ; नवनीत राणा आक्रमक

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा आज मुंबईतील सत्र न्यायालयात हजर झाले होते. खासदार रवी राणा आणि नवनीत राणा यांचा जामीन रद्द करण्यासाठी मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी मुंबई सत्र न्यायालयाने येत्या २७ जूनपर्यंत पुढे ढकलली आहे. यावेळी नवनीत राणा यांमी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली.

नवनीत राणा म्हणाल्या, “पोलीस विभागाने आज न्यायालयात आमचा जामीन रद्द करण्यात यावा, असा दबाव टाकला. मात्र न्यायालयाने पोलिसांना फटकारले व पुढील सुनावणी २७ जून रोजी ठेवली आहे. हे सरकार सांगते की हनुमान चालीसा वाचायची असेल तर काश्मीरमध्ये जाऊन वाचावी. ज्या दिवशी तुम्ही मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचाल त्या दिवशी आम्ही काश्मीरमध्ये हनुमान चालीसा नक्कीच वाचू. हनुमान चालीसा वाचल्याबद्दल आमच्यावर देशद्रोहाचा खटला भरला जातो.”

मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना नवनीत राणा म्हणाल्या, “राज्याचे प्रमुख आपल्या समविचारी लोकांना वेगळे ठेवून बाकीच्यांवर कारवाई करतात. मुख्य व्यक्ती वेगळ्या वाटेवर चालत असेल, तर त्यांना रस्ता दाखवण्यासाठी जनतेने आपल्याला निवडले आहे. शरद पवार आज थकलेले असूनही प्रत्येक जिल्ह्यात जाऊन शेतकऱ्यांच्या भेटी घेतात.”

“उद्धव ठाकरे सरकारकडे फक्त आम्हाला अडचणीत आणण्यासाठी वेळ आहे, राज्याच्या विकासासाठी वेळ नाही. एकीकडे आम्हाला हनुमान चालीसा वाचू दिली जात नाही आणि दुसरीकडे आदित्य ठाकरे रामललाच्या दर्शनासाठी अयोध्येला जात आहेत. त्यांच्यासाठी हे हिंदुत्व नाही. उद्धव ठाकरे औरंगाबादला गेले पण ओवेसी आणि औरंगजेब यांच्यावर एक शब्दही उच्चारला नाही, यावरून त्यांचे हिंदुत्व कसे आहे हे स्पष्टपणे समजते”, असे नवनीत राणा म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!