मुंबई : शिवसेनेचे नेते रामदास कदम सध्या पक्षामधील काही मंत्र्यांवर नाराज असल्याचे दिसत आहे. रामदास कदमांच्या नाराजीवरुन पक्षांतर्गत वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. रामदास कदम यांनी खदखद व्यक्त करताना अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयावरही सवाल केला आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
रामदास कदम यांनी आज पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेतील अनेक नेत्यांना धारेवर धरले आहे. त्यांच्यावरील आरोप खोडून काढतानाच अनिल परब यांच्यामुळे पक्ष रसातळाला जात असल्याचंही स्पष्ट केलं आहे. कदम पत्राच्या शेवटी म्हणतात की, जे मंत्री हरामखोरी करीत आहेत व शिवसेनेशी बेईमानी करत मनसे व राष्ट्रवादीच्या पुढाऱ्यांना सोबत घेऊन शिवसेना संपविण्याचा, रामदास कदमला संपविण्याचा घाट घालत आहेत, त्यांच्यावर कारवाई करावी, अशी विनंती करून भेटी अंती सविस्तर बोलू, असेही रामदास कदम म्हणाले आहेत.

रामदास कदम पत्रामध्ये शेवटी म्हणाले आहेत की, जे मंत्री हरामखोरी करीत आहेत आणि शिवसेनेशी बेईमानी करत मनसे आणि राष्ट्रवादीच्या पुढाऱ्यांना सोबत घेऊन शिवसेना संपविण्याचा, रामदास कदमला संपविण्याचा घाट घालत आहेत, त्यांच्यावर कारवाई करावी, अशी विनंती करून भेटी अंती सविस्तर बोलू, असे रामदास कदम म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- अमित शहांचा महाराष्ट्र दौरा; सहकार वाचवण्यासाठी सांगितला नवा प्लान
- सहकार क्षेत्रात जो पक्षपात होतोय, त्यात मी मूकदर्शक बनून राहू शकत नाही- अमित शहा
- सुहास दाशरथेंना औरंगाबादेत मनसे देणार नवीन जबाबदारी; राज ठाकरेंच्या सूचना!
- मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी; नांदेड, जालना, औरंगाबादहून पुण्याला जाणे होणार सोप्पे..!
- इतका भ्रष्टाचार माजवला तर तपास यंत्रणा तुमची कॉलर पकडणारच- सदाभाऊ खोत


