Share

मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी; नांदेड, जालना, औरंगाबादहून पुण्याला जाणे होणार सोप्पे..!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबादः आता नांदेड, जालना, औरंगाबादहून पुण्याला जाणे अधिक सोप्पे होणार आहे. पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी नवी रेल्वे सुरु करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी दिली. मराठवाड्यातील प्रवाशांच्या दृष्टीने ही मोठी आणि आनंदाची बातमी असून १ जानेवारीपासून ही रेल्वे सुरु होणार आहे. ही रेल्वे आठवड्यातून दोन दिवस धावेल आणि नंतर ती संपूर्ण आठवडाभर धावेल, असेही सांगण्यात आले आहे. येत्या आठवड्यात याबाबत परिपत्रक जाहीर करण्यात येणार आहे.

बोर्डाकडून औरंगाबाद-अंकाई या ९८ किलोमीटर दुहेरीकरणासाठी सर्व्हे करण्यासाठी आदेश काढण्यात आले आहे. त्यामुळे औरंगाबाद-अंकाई दुहेरीकरणाचा मार्ग लवकरच मोकळा होईल. आणि लवकरच दुहेरीकरण होईल अशी अपेक्षा देखील आता व्यक्त केली जात आहे. दिल्ली बोर्डाचे पंकजकुमार यांनी औरंगाबाद ते अंकाई दुहेरीकरणाच्या सर्वेक्षणाबद्दल सिकंदराबाद रेल्वे बोर्डाला पत्राद्वारे आदेश दिले आहे.

त्यासाठी १ कोटी ९६ लाख रुपये सर्वेक्षण करण्यासाठी लागणार आहे. त्यामुळे आता दुहेरीकरण करण्यासाठी मार्ग मोकळा होऊन लवकरच औरंगाबाद ते अंकाई दरम्यान दुहेरीकरण होईल. अशी अपेक्षा अनेकांकडून व्यक्त केली जात आहे. औरंगाबाद ते अंकाई या ९८ किलोमीटर दुहेरीकरणासाठी अंतिम सर्वे आज मंजूर केला आहे. त्यामुळे येणाऱ्या रेल्वे बजेटमध्ये यासाठी निधी मंजुरी साठीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे औरंगाबाद-अंकाई दुहेरीकरण करण्यासाठी मार्ग लवकरच होईल अशी अपेक्षा आहे. अशी मराठवाडा रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष अपेक्षा अनंत बोरकर यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!