Share

सहकार क्षेत्रात जो पक्षपात होतोय, त्यात मी मूकदर्शक बनून राहू शकत नाही- अमित शहा

Published On: 

🕒 1 min read

प्रवरानगर : केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शहा(Amit Shah) हे आज(१८ डिसें.) महाराष्ट्र दौऱ्यावर असून प्रवरानगरमध्ये आज पहिली सहकार परिषद पार पडली. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे(Raosaheb Danve), केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड(Bhagavat Karad), चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil), राधाकृष्ण विखे पाटील(Radhakrushn Vikhe Patil) आदी उपस्थित होते.

यावेळी बोलत असतांना अमित शहा म्हणाले की, साखर कारखान्यांच्या समस्या राज्याच्या पातळीवर का सोडवल्या जात नाहीत. या समस्यांवर दिल्लीत का सुनावणी घ्यावी लागते? असा सवाल करत ते म्हणाले की,मी सर्वांना सांगतो, मला सल्ला देण्यापेक्षा स्वत:मध्ये डोकावून पाहा. राजकारण बाजूला ठेवून सहकाराला पाहण्याची तुम्हाला अधिक गरज आहे. सहकार क्षेत्रात पक्षपात होत आहे. त्यामुळे मी हा पक्षपात मूकदर्शक बनून पाहू शकत नाही. तो दूर करणं माझी जबाबदारी आहे. तेच सांगण्यासाठी मी इथं आलो आहे. आपण सर्वांनी राजकारण बाजूला ठेवून काम केलं पाहिजे’, असे शहा म्हणाले.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’आम्ही बँका वाचवण्यासाठी जे काही करायचे ते करू. बँका वाचवण्यासाठी आता नव्या कमिट्या स्थापन करणार नाही. कमिट्या तयार करून वेळ घालवणार नाही. अनके समित्या बनल्या, अनेक अहवाल आले. अहवाल रद्दीत गेले. कशाचीच अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे समितीची गरज नाही. तुमच्यासोबत बसून समस्या समजून त्या मार्गी लावू’, असेही शहा यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!