मुंबई: विराट कोहलीने त्याचे शेवटचे आंतरराष्ट्रीय शतक २०१९ मध्ये बांगलादेश विरुद्ध पिंक-बॉल कसोटीत झळकावले होते. तेव्हापासून, चाहते त्याच्या ७१व्या शतकाची प्रतीक्षा करत आहेत. दोन वर्षांहून अधिक काळ त्याला सर्व फॉरमॅटमध्ये शतक झळकावण्यात अपयश आले आहे. विराटच्या डोक्यात फक्त ७१वे शतक फिरत असून त्याचे खेळावर लक्ष केंद्रित होत नसल्याचे मत भारताचे माजी खेळाडू मदन लाल यांनी व्यक्त केले आहे.
मदन लाल (madan lal) यांनी १०० कसोटी सामन्यात विराटच्या फलंदाजीवर टीका केली आहे. ते म्हणाले “मी त्याची फलंदाजी पाहिली. मला कुठेतरी त्याच्या एकाग्रतेची कमतरता जाणवते. प्रश्न होता तो बॅकफूटवर का गेला? कदाचित मानसिक अडथळा असेल. पण त्याची फलंदाजी खूपच सकारात्मक होती. क्रीझवर येताच त्याला धावा मिळू लागल्या. पण तो नक्कीच सक्षम आहे,” मदन लाल म्हणाले.
मदन लाल यांनी विराटच्या (virat kohli) ७१ व्या शतकाबाबतही वक्तव्य केले आहे. “त्याने शतक करावे अशी आपली सर्वांची इच्छा आहे. मला खात्री आहे की हे त्याच्या डोक्यात चालत असेल. आणि आणखी एक गोष्ट, त्याचे पुढचे शतक गाठण्यासाठी जितके जास्त डाव लागतील, तितकेच त्याच्यावर दडपण असेल. बेंगळुरूमध्ये त्याला एक फायदा मिळेल, तो म्हणजे खेळपट्टी बाऊन्स देते आणि त्यामुळे तो अधिक चांगला खेळू शकतो.” आजपासून भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरी कसोटी बेंगळुरू येथे खेळवली जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- विदर्भ – मराठवाड्याला अवकाळी पावसाचा धोका!
- “भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे लव्ह मॅरेज होते”- आमदार गुलाबराव पाटील
- Women’s WC 2022: मिताली राजने घडवला नवीन इतिहास! विश्वचषकात सर्वाधीक वेळा नेतृत्वाचा मान मिळवला
- “आता पुढचा नंबर अनिल परबचा” – किरीट सोमय्या
- “त्यावेळी मुंबईला सावरणारे आता…”, केशव उपाध्येंचा शिवसेनेवर हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

