Share

तू तिसऱ्यांदा लग्न करू नको; यावर काय म्हणाली श्वेता तिवारी…

Published On: 

मुंबई : अभिनेत्री श्वेताच्या तिसऱ्या लग्नाचा विषय चर्चेत आहे. अभिनेत्री श्वेता तिवारी  तिचं लग्न, पती, वैयक्तिक आयुष्य, तिची विधानं अशा विविध  गोष्टींमुळे चर्चेत असते. श्वेता तिवारीने नुकतंच एका मुलाखती दरम्यान एक विधान केलं, जे सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहे. श्वेता आपल्या तिसऱ्या लग्नाबाबत बोलती झाली. “मला म्हणतात, तू तिसऱ्यांदा लग्न करू नको, हे ठरवणारे तुम्ही कोण?”, असा परखड सवाल श्वेता तिवारीने विचारला आहे. या मुलाखती दरम्यान ती बऱ्याच मुद्द्यांवर बोलली. एकेरी पालकत्वाच्या मुद्द्यावरही ती बोलली. तिची ही मुलाखत आणि त्यातील मुद्दे सध्या चर्चेत आहेत

श्वेता तिवारी तिच्या तिसऱ्या लग्नाबाबत बोलती झाली. “मला म्हणतात, तू तिसऱ्यांदा लग्न करू नको, हे ठरवणारे तुम्ही कोण?”, असा परखड सवाल श्वेता तिवारीने विचारला आहे. “तुम्हाला विचारून लग्न करू का? तुम्ही माझ्या लग्नाचा खर्च करणारा आहात का?, तुम्ही कोण आहात? जे मला सांगताहेत की तिसरं लग्न करू नको. तो माझा निर्णय आहे, मला तिसरं लग्न करायचं आहे की नाही की मला संन्यास घ्यायचा आहे. ते मी ठरवेन”, असं श्वेता म्हणाली आहे.

तुझी मुलगी 5 लग्न करेन”

“लोक मला म्हणतात, मी दोन लग्न केलीत तर माझी मुलगी 5 लग्न करेन. अरे पण ती ज्या परिस्थितीतून गेली आहे, त्यामुळे काय माहित तिचं लग्नाबाबत काय मत आहे. कदाचित ती लग्नच नाही करणार”, असं श्वेता म्हणाली आहे. “एकेरी पालकत्व कठीण नसतं जर तुम्ही कमावत असाल आणि हिंमत असेल तर तुम्ही नक्कीच चांगल्या प्रकारे मुलांचं संगोपन करू शकता”, असंही ती म्हणाली आहे. मुली-मुलांमध्ये भेदभाव“ एखाद्या मुलाचे विवाहबाह्य संबंध असतील तर त्याला कुणी काही बोलत नाही पण मुलीचे असतील तर तिच्या विषयी खूप चर्चा होते”, असंही श्वेता म्हणाली.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!