लालसगाव : गेले काही दिवस महाराष्ट्रात आरोप प्रत्यारोपांचं वादळ आलं आहे. यातच आता पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री, जळगावच्या ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे आमदार गुलाबराव पाटील यांनी आपल्या खास शैलीत भाजपवर निशाणा साधला आहे. लासगावमध्ये एका कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. शिवसेना पैलवान आहे आणि आम्हीही पैलवान आहोत. मुंबईचे घोडामैदान दूर नाही, असा इशारा भाजपला दिला आहे.
मतांची ब्लड बँक
यावेळी बोलताना पाटील म्हणाले की, राजकारणी माणसाने चार लोकांशी नाते ठेवले पाहिजे. पहिले शेतकरी, दुसरे पोलीस, तिसरे व्यापारी आणि चौथे डॉक्टर. ही मतांची ब्लड बँक आहे. पोलिसाला फोन करून एक मोटरसायकल सोडल्यास दोन मते पक्की होतात. डॉक्टरांना फोन करून बिल कमी केले, तर दहा मते पक्की होतात. एक शेतकऱ्याची विजेची लाइन जोडून दिली, तर 50 मते मिळतात. व्यापाऱ्याला त्रास नाही दिला, तर पुड्या बांधता बांधता शंभर मते पक्की होतात. सुरुवातीला राजकारणी माणसाची वेगवेगळी परिस्थिती असते. वेगवेगळ्या विषयाच्या डॉक्टरप्रमाणे आमचे पक्ष वेगवेगळे असले, तरी ही माणसाची भावना ही कार्य करण्याचीच असते असेही पाटील म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

