🕒 1 min read
मुंबई: विधानसभा अध्यक्ष्यांना राज्य सरकारच्या षडयंत्राचे पुरावे असलेला पेनड्राईव्ह देऊन राजकीय वर्तुळाची झोप उडवणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले कि, १२ मार्चच्या मुंबई बॉम्बस्फोटांना 3 दशके झाली तरी त्याचे पडसाद आणि घाव आपल्या मनावर कायम आहेत. बॉम्बस्फोटांच्या आरोपींशी व्यवहार करणारे जेलमध्ये जाऊनही मंत्रिमंडळात कायम आहेत, याविषयी खंत वाटते. मार्च २०२१ मध्ये मी भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेत होम डिपार्टमेंटमधील बदल्यांचा महाघोटाळा बाहेर काढला होता त्याचे ट्रान्सक्रिप्ट पेन ड्राईव्ह माझ्याकडे आहेत. देशाच्या होम डिपार्टमेंटला देणार असल्याचं बोललो होतो आणि त्याच दिवशी मी दिल्लीला जाऊन होम सेक्रेटरींना माहिती सादर केली. त्याचं गांभीर्य ओळखून न्यायालयाने सगळी चौकशी सीबीआयला सुपूर्द केली होती.
तत्कालीन गृहमंत्र्यांचा त्यात समावेश असून ते सध्या जेलमध्ये आहेत. राज्य सरकारने आपला घोटाळा दाबण्यासाठी एक एफआयआर दाखल केला आहे. ऑफिशिअल माहिती लीक कशी झाली, हा आरोप माझ्यावर करण्यात आला होता परंतु विरोधी पक्षनेता म्हणून मला प्रिव्हिलेज आहे, याची माहिती कुठून आली, हे मला विचारलं जाऊ नये. पुन्हा मला प्रश्नावली पाठवली आणि कोर्टात सांगितलं की वारंवार ते पाठवूनही मी उत्तर देत नाही. आता काल पुणे पोलिसांनी मला सीआरपीसी १६० ची नोटीस पाठवली आहे. तसेच उद्या ११ वाजता बीकेसीच्या सायबर पोलिसात मला बोलावलं आहे. माझ्या माहितीचा स्त्रोत विचारला जाऊ शकत नाही. मी कुठलीही माहिती बाहेर न येऊ देता देशाच्या सचिवांना दिली मात्र राज्याच्या मंत्र्यांनी ती बाहेर लीक केल्याचे पुरावे माझ्याकडे आहेत आणि मी पोलिसांना याची माहिती देणार आहे, असे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
