🕒 1 min read
मुंबई : बुलढाण्यामध्ये एका कार्यक्रमाच्यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघासंदर्भात एक वक्तव्य केलं होतं. त्यामुळे राज्यातील राज्यात खळबळ उडाली आहे. अशातच नाना पटोले यांच्या वक्तव्याला भाजप पक्षाचे नेते राम कदम यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
काय म्हणाले राम कदम ?
संघावर बोलण्याआधी भारत तोडो म्हणणारे नेते तुमच्या काँग्रेस पक्षात येतात, आणि तुमचे नेते मग भारत जोडो म्हणत देशभर फिरतात. याच्यावर आधी बोला, असं म्हणत राम कदम यांनी नाना पटोले यांना चांगलंच सुनावलं आहे. राम कदम यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना राम कदम असंही म्हणाले की, संघावर बोलणाऱ्यांनी आधी संघाच्या शाखेवर जाऊन पाहावं. देशप्रेम काय असतं, समर्पित भावानं लोकांची सेवा कशी करायची असते हे तेव्हा त्यांना कळेल. तसेच सत्तेच्या काळात महाविकास आघाडीने वसुलीचा कार्यक्रम केला असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
नाना पटोले यांचे वक्तव्य –
दरम्यान, प्रशासकीय व्यवस्थेमध्ये आपण पाहिलं, अधिकारी व्हायचं असेल तर तुम्हाला यूपीएससीच्या परीक्षा पास कराव्या लागतात. पण आता परीक्षा नाही. नागपूरची चड्डी घातली की तो डायरेक्ट जॉईन्ट सेक्रेटरीच्या लेव्हलवर जातो. असं आपण पाहिलंय, असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं होतं.
महत्वाच्या बातम्या :
- Nana Patole | “नागपूरचा गणवेश घातला की तो व्यक्ती…”; पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर हल्ला
- Oppo’s New Smartphone | Oppo ने केले आपले Oppo A77s आणि Oppo A17 स्मार्टफोन लाँच
- Ajit Pawar | अजित पवार कुणाचा दसरा मेळावा पाहणार? उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे?
- Job Alert | एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया मध्ये 156 पदांसाठी भरती
- मोठी बातमी : वंचित बहुजन आघाडीला खिंडार, ‘हा’ नेता करणार शिवसेनेत प्रवेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
