🕒 1 min read
बुलढाणा : सध्या राज्यामध्ये अनेक गोष्टींवरून राजकारण तापलं आहे. त्यावरून सत्ताधारी नेते आणि विरोधी नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची खेळी सुरू असते. काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये सतत काहीना काहीतरी सुरू असतेच. अशातच नाना पटोले यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले नाना पटोले ?
नागपूरचा गणवेश घातला की तो व्यक्ती डायरेक्ट जॉईन्ट सेक्रेटरी होतो, असं म्हणत नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. पटोले यांचा निशाणा अप्रत्यक्षपणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरच होता?, असा सवालही विचारला जात आहे.नाना पटोले बुलढाण्यामधील एका कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यावेळी भाषण करताना ते बोलत होते.
नाना पटोले म्हणाले की, प्रशासकीय व्यवस्थेमध्ये आपण पाहिलं, अधिकारी व्हायचं असेल तर तुम्हाला यूपीएससीच्या परीक्षा पास कराव्या लागतात. पण आता परीक्षा नाही. नागपूरची चड्डी घातली की तो डायरेक्ट जॉईन्ट सेक्रेटरीच्या लेव्हलवर जातो, असं आपण पाहिलंय.
तसेच,राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या नुकत्याच बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्यावरून राज्यात पुन्हा वादाला कारण मिळालं असल्याची शक्यता वर्तवण्यात येतं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Ajit Pawar | अजित पवार कुणाचा दसरा मेळावा पाहणार? उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे?
- Job Alert | एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया मध्ये 156 पदांसाठी भरती
- मोठी बातमी : वंचित बहुजन आघाडीला खिंडार, ‘हा’ नेता करणार शिवसेनेत प्रवेश
- Maharashtra Rain Update | राज्यात सर्वत्र परतीच्या पावसाची धुमाकूळ
- Shivsena | निर्मला सीतारामन यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर शिवसेनेचे प्रत्युत्तर, म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
