मुंबई : भारतीय संघाच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (IND vs SA) चौथ्या टी-२० विजयाचे श्रेय दिनेश कार्तिकला जाते. सामन्यात कठीण काळात फलंदाजीला आलेल्या कार्तिकने डॅशिंग फिनिशरची भूमिका बजावली. त्याने आपले पहिले टी-२० आंतरराष्ट्रीय अर्धशतक झळकावले. कार्तिकला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. यानंतर कार्तिकने मोठी प्रतिक्रिया दिली.
कार्तिक म्हणाला, ”चांगलं वाटत आहे. मला या सेटअपमध्ये खूप सुरक्षित वाटते. शेवटच्या सामन्यात गोष्टी प्लॅननुसार घडल्या नाहीत, पण आज मी गेलो आणि व्यक्त झालो. मी परिस्थितीचे चांगल्या प्रकारे मूल्यांकन करण्यास सक्षम आहे आणि हे सरावाने येते. याचे श्रेय माझ्या प्रशिक्षकाला जाते.”
DK – The finisher has still got it ????????#DineshKarthik #India #INDvsSA #Cricket #T20Is pic.twitter.com/TWnZoRE5zC
— Wisden India (@WisdenIndia) June 12, 2022
खेळपट्टीबाबत कार्तिक म्हणाला, ”ही खेळपट्टी फलंदाजीसाठी अवघड होती. सीमारेषा भेदणे अवघड होते. आमचे सलामीवीरांनी आम्हाला चांगली सुरुवात करून देतात. मी गेल्यावर हार्दिकने मला माझा वेळ घेण्यास सांगितले. अशा खेळपट्ट्यांवर दीर्घकाळ टिकून राहिलेल्या खेळाडूंनी उभे राहणे गरजेचे होते. बंगळुरू हे माझे घरचे मैदान आहे. मी तिथे खूप खेळलो आहे. द्विपक्षीय मालिका अंतिम सामन्यापर्यंत जात असल्याचे पाहणे चांगले आहे. याचे श्रेय राहुल द्रविडला जाते. त्याच्याकडे शांततेची अद्भुत भावना आहे. ड्रेसिंग रूम ही एक शांत जागा आहे. दबाव स्वीकारण्यास शिकणे महत्वाचे आहे.”
प्रथम फलंदाजी करताना भारताने ६ बाद १६९ धावा केल्या. कार्तिकने ५५ धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ ८७ धावा करून बाद झाला. मालिका आता २-२ अशी बरोबरीत असून पाचवा सामना निर्णायक असेल.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

