🕒 1 min read
मुंबई: १८५७ च्या लढ्यातील कणखर नेतृत्व, ब्रिटिशांशी झुंज देत भारतमातेसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या महान वीरांगना, आदर्श राज्यकर्त्या झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांची आज पुण्यतिथी आहे. यानिमित्त भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
“असामान्य पराक्रमाच्या मूर्तिमंत,ज्यांच्या कार्यकर्तृत्वातून सदैव प्रेरणा मिळते अशा झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांना स्मृतीदिनी त्रिवार वंदन! आज देशातील प्रत्येक महिलेने त्यांच्या कर्तृत्वाचा आदर्श घेत आत्मरक्षणासाठी सज्ज होणे आवश्यक आहे.”, असे ट्वीट चित्रा वाघ यांनी केले आहे.
असामान्य पराक्रमाच्या मूर्तिमंत,ज्यांच्या कार्यकर्तृत्वातून सदैव प्रेरणा मिळते अशा झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांना स्मृतीदिनी त्रिवार वंदन !
आज देशातील प्रत्येक महिलेने त्यांच्या कर्तृत्वाचा आदर्श घेत आत्मरक्षणासाठी सज्ज होणे आवश्यक आहे.#JhansiKiRani #राणीलक्ष्मीबाई #अभिवादन pic.twitter.com/wXg7pFOXuW— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) June 18, 2022
दरम्यान आज राणी लक्ष्मीबाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त अनेक राजकीय मंडळीकडून अभिवादन केले जात आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्वीटमध्ये म्हटले की, “राणी लक्ष्मीबाई यांनी ब्रिटिशांशी निकराने लढा देत आपल्या प्रजेचे रक्षण केले. मातृभूमीच्या रक्षणासाठी आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या महान वीरांगना, धैर्य व शौर्याचे प्रतीक झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!”
महत्वाच्या बातम्या:
- IND vs SA 4th T20 : मॅन ऑफ द मॅच ठरलेल्या कार्तिकनं कोणाला दिलं आपल्या फलंदाजीचं श्रेय? वाचा!
- Agneepath Scheme: ‘अग्निपथ’ योजनेविरोधात आज बिहार बंद
- “आम्ही सैनिकांना भाड्याने ठेवू शकत नाही”, ‘अग्निपथ’ योजनेवर भगवंत मान यांची टीका
- मग छातीत कळा नेमक्या कशामुळे?; ‘त्या’ वक्तव्यानंतर भातखळकरांचा भुजबळांना टोला
- “अग्निपथ योजना लादून मोदी सरकार युवकांना…”, ‘राष्ट्रवादी’ची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
