बिहार: देशात सध्या अग्निपथ योजनामुळे वातावरण चांगलेच तापताना दिसून येत आहे. केंद्र सरकारने अग्निपथ भरती योजनेअंतर्गत तरुणांना केवळ चार वर्षांसाठीच सैन्यात भरती केली जाणार असल्याचे म्हटले आहे. देशातील तरुणांनी या योजनेला कडाडून विरोध करत विविध ठिकाणी आंदोलन छेडले आहे. आता याविरोधात बिहारने आज बंद पुकारला आहे.
बिहारमध्ये आंदोलकांनी १२ रेल्वे जाळल्या असून या योजनेविरोधातील १३ राज्यांत प्रचंड विरोध केला जात आहे. त्यात बिहार आणि तेलंगणध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. आता काही विद्यार्थी संघटनांनी आज बिहार बंद पुकारला असून या बंदला लालू प्रसाद यादव यांचा पक्ष आरजेडीने समर्थन दिले आहे. तसेच बिहारमध्ये काही जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद केली असून रोजगार संघर्ष संयुक्त मोर्चा आणि सैन्य भरती जवान मोर्चा यांनी आज बिहार बंद पुकारला आहे.
दरम्यान सैन्यदलांत १७.५ ते २१ वर्षे या वयोगटातील तरुणांना अग्निवीर म्हणून सेवेची संधी मिळणार असून तरुणांचा रोष पाहता केंद्र सरकारने वयोमर्यादा २१ वरुन २३ केली आहे. चार वर्षांच्या कालावधीसाठी तरुणांना यात समाविष्ट केले जाणार आहे. तसेच महिन्याला ३० ते ४० हजार रुपये वेतनही मिळणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “आम्ही सैनिकांना भाड्याने ठेवू शकत नाही”, ‘अग्निपथ’ योजनेवर भगवंत मान यांची टीका
- मग छातीत कळा नेमक्या कशामुळे?; ‘त्या’ वक्तव्यानंतर भातखळकरांचा भुजबळांना टोला
- “अग्निपथ योजना लादून मोदी सरकार युवकांना…”, ‘राष्ट्रवादी’ची टीका
- पंतप्रधान मोदींच्या आईने गाठली वयाची ‘शंभरी’; निवासस्थानी जाऊन घेतली भेट
- पंतप्रधान मोदी आतापर्यंतचे सर्वाधिक गोंधळलेले पंतप्रधान; ‘राष्ट्रवादी’ची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
