मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. यावर्षी ९६.९४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मात्र परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी निराश न होता, पुन्हा एकदा जोमाने प्रयत्न करण्याचा सल्ला देत “मी दोन वर्षे जेलमध्ये राहून आलो तरी मला कधीही डिप्रेशन आले नाही” असे म्हटले. यावरच भाजप नेते अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“मग छातीत कळा नेमक्या कशामुळे येत होत्या?”, असा खोचक सवाल करत अतुल भातखळकर यांनी छगन भुजबळ यांना टोला लगावला आहे. याबाबत त्यांनी ट्वीट केले आहे.

दरम्यान “मी दोन वर्षे जेलमध्ये राहून आलो तरी मला कधीही डिप्रेशन आले नाही, मग तुम्हाला ऑनलाइन शिक्षणामुळे डिप्रेशन कसे येते?” असा सवाल छगन भुजबळ यांनी परिक्षेत अयशस्वी झालेल्या व अपेक्षित यश न मिळवू शकलेल्या विद्यार्थ्यांना केला होता. काल ते एका कर्यक्रमात बोलत होते.
महत्वाच्या बातम्या:
- “अग्निपथ योजना लादून मोदी सरकार युवकांना…”, ‘राष्ट्रवादी’ची टीका
- पंतप्रधान मोदींच्या आईने गाठली वयाची ‘शंभरी’; निवासस्थानी जाऊन घेतली भेट
- पंतप्रधान मोदी आतापर्यंतचे सर्वाधिक गोंधळलेले पंतप्रधान; ‘राष्ट्रवादी’ची टीका
- पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर ध्वनी प्रदूषणाची समस्या; सुप्रिया सुळेंनी केली गडकरींकडे ‘ही’ मागणी
- IND vs SA 4th t20 : भारताचं दमदार कमबॅक..! दक्षिण आफ्रिकेला ८२ धावांनी हरवत मालिकेत साधली बरोबरी


