Share

Raju Srivastav Death | जाता जाता सर्वांना हसवून गेले राजू श्रीवास्तव, कॉमेडियनचा शेवटचा व्हिडिओ व्हायरल

Published On: 

🕒 1 min read

स्टँड-अप कॉमेडी च्या माध्यमातून सर्वांना हसवणारे कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. सिनेविश्वापासून राजकीय वर्तुळापर्यंत दु:खाचे वातावरण आहे. वयाच्या ५८ व्या वर्षी जगाचा निरोप घेणारे राजू श्रीवास्तव यांनी आयुष्यात सर्वांना खूप हसवले.

प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या निधनानंतर त्यांचा शेवटचा कॉमेडी व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ त्याच्या चाहत्यांना खूप भावूक करत आहे. या व्हिडिओमध्येही राजू श्रीवास्तव यांची कॉमिक स्टाइल पाहायला मिळते. त्यांनी हा व्हिडीओ बनवला होता आणि मृत्यूच्या काही दिवस आधी तो इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला होता.

शशी कपूर आणि विनोद खन्ना यांच्या स्टाईलमध्ये दिसले राजू श्रीवास्तव 

राजू श्रीवास्तव अनेकदा चाहत्यांमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींची कॉपी करताना दिसले. या व्हिडिओमध्येही राजू श्रीवास्तव कोविड काळातील अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील कॉलर ट्यूनबद्दल बोलताना दिसत आहेत. ही कॉलर ट्यून शशी कपूर आणि विनोद खन्ना यांचा आवाजात असती तर ती कशी वाटली असती हे राजूंनी व्हिडिओमध्ये सांगितले आहे. हा व्हिडिओ लोकांना खूप भावूक करत आहे.

https://www.instagram.com/p/ChCmWHSlfR9/

10 ऑगस्ट रोजी राजू श्रीवास्तव यांना दिल्लीतील जिममध्ये हृदयविकाराचा झटका आला होता, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तब्बल 41 दिवस रुग्णालयात प्रकृतीशी लढा दिल्यानंतर आज म्हणजेच 21 सप्टेंबर रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला. ‘मैने प्यार किया’, ‘बाजीगर’, ‘बॉम्बे टू गोवा’ आणि ‘आमदनी अठन्नी खर्चा रुपैया’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!