टीम महाराष्ट्र देशा : गृहमंत्री अमित शाह यांनी कलम ३७० हटवण्याचा प्रस्ताव राज्यसभेत ठेवला आहे. हा प्रस्ताव सभागृहात मांडताच विरोधकांनी मोठा गदारोळ घातला. जम्मू काश्मीरचे विभाजन करण्यात आले असून जम्मू-काश्मीरसह लडाखलाही केंद्रशासित घोषित करण्यात आले आहे. म्हणजेच जम्मू काश्मीर आणि लडाख हे दोन्ही वेगवेगळे केंद्रशासित प्रदेश होणार आहेत.
सरकारच्या या निर्णयावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ‘गेल्या काही काळातील केंद्र सरकारचा उत्तम निर्णय !’ अशा शब्दात सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. राज ठाकरे यांच्यासोबत अनेक विरोधी पक्षांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे. यात एआयएडीएमके, लोजपा, आरपीआय, अकाली दल, शिवसेना, वायएसआरसीपी, टीआरएस, बीजेडी, टीडीपी, आम आदमी पार्टी आणि बसपा यांचा समावेश आहे.
#Article370Scrapped #Kashmir
गेल्या काही काळातील केंद्र सरकारचा उत्तम निर्णय !After a long time, the Central Govt makes an exceptional decision !
— Raj Thackeray (@RajThackeray) August 5, 2019
राज ठाकरे यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधी भूमिका घेतली होती. त्यांनी निवडणूक काळात भाजपच्या विरोधात प्रचार केला होता. विशेष म्हणजे राज ठाकरे यांनी लोक्साबा निवडणूकीसाठी एकही उमेदवार दिला नव्हता तरीही त्यांनी प्रचार केला होता.
दरम्यान, शिवसेनेकडूनही या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. सरकारच्या या पोलादी निर्णयाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे याचं स्वप्न पूर्ण झालं असल्याच उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. तसेच पुढे बोलताना त्यांनी आज खऱ्या अर्थाने देश स्वतंत्र झाला असंही विधान केले आहे.
#Article370 : माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती यांना अटक
राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेचे पोस्टर जारी
दिल्लीपासून गावखेड्यातल्या गल्लीपर्यंत साजरा होतोय कलम ३७० हटवण्याचा आनंद
#Article370 : पीडीपीच्या दोन खासदारांनी केला देशाचे संविधान फाडण्याचा प्रयत्न
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

