टीम महाराष्ट्र देशा- गृहमंत्री अमित शाह यांनी कलम ३७० हटवण्याचा प्रस्ताव राज्यसभेत ठेवला आहे. हा प्रस्ताव सभागृहात मांडताच विरोधकांनी मोठा गदारोळ घातला. जम्मू काश्मीरचे विभाजन करण्यात आले असून जम्मू-काश्मीरसह लडाखलाही केंद्रशासित घोषित करण्यात आले आहे. म्हणजेच जम्मू काश्मीर आणि लडाख हे दोन्ही वेगवेगळे केंद्रशासित प्रदेश होणार आहेत.
Resolution revoking Article 370 from J&K moved in Rajya Sabha. pic.twitter.com/ayUAqJdb6o
— ANI (@ANI) August 5, 2019
कलम ३७० हटवले गेल्यामुळे जम्मू-काश्मीर आता राज्य राहिले नाही. जम्मू-काश्मीर केंद्र शासित प्रदेश होईल. लडाखला विना विधेयकाचे केंद्रशासित प्रदेश करण्यात आले आहे.याविषयी जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी निषेध व्यक्त केला आहे. त्यांनी ट्वीट करून ‘आजचा दिवस हा भारतीय लोकशाहीतील काळा दिवस आहे अस त्यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी या निर्णयावरून हे कलम हटवणे हे अनैतिक आणि असंवैधानिक आहे असंही त्यांनी म्हटले आहे.
हा प्रस्ताव राज्यसभेत मांडला गेल्यानंतर कॉंग्रेस आणि विरोधी पक्षांनी थयथयाट सुरु केला असून संसदेत गोधळ घालायला सुरुवात केली आहे. दरम्यान, पीडीपीच्या दोन खासदारांनी चक्क देशाचे संविधान फाडण्याचा प्रयत्न केला आहे. या खासदारांच्या कृत्यामुळे पीडीपीचा खरा चेहरा समोर आला असून आता पीडीपीवर चौफेर टीका होऊ लागली आहे.
दरम्यान,उपसभापती व्यंकय्या नायडू यांनी या दोन खासदारांना बाहेर काढलं.. शर्ट फाडत, खांद्याला काळा धागा लावत हे दोन खासदार बाहेर आले असून सरकारविरोधात घोषणाबाजी करत आहेत

महत्वाच्या बातम्या
मोदी सरकारचा धमाका ; जम्मू-काश्मीरच्या पुनर्रचनेचा प्रस्ताव
‘मावळमध्ये पराभव होऊ शकतो तर बारामतीत अवघड नाही’
कॉंग्रेसमध्ये राष्ट्रवादीचं विलीनीकरण करा, ‘या’ बड्या नेत्याने केली मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

