Share

दिल्लीपासून गावखेड्यातल्या गल्लीपर्यंत साजरा होतोय कलम ३७० हटवण्याचा आनंद

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : संपूर्ण भारतीयांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असणारे जम्मू काश्मीरमधील ३७० कलम हटवण्याचे विधयेक मोदी सरकारकडून राज्यसभेत ठेवण्यात आले आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी ३७०  हटवण्याचा प्रस्ताव राज्यसभेत सादर करताच राजधानी दिल्लीपासून गाव खेडयातल्या गल्लीपर्यंत आनंद साजरा केला जात आहे.

महाराष्ट्रामध्ये पावसाने जनजीवन विस्कळीत केले असताना देखील केंद्र सरकारने कलम ३७० रद्द केल्याचा आनंद मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात केवळ अडीच हजार लोकसंख्या असणाऱ्या सौंदरे गावामध्ये युवकांनी दूध वाटत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी भारत माता की जय, पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या.

काश्मीरमधून हटणार ‘कलम ३७०’

केंद्रातील मोदी सरकारने आपले बहुमत वापरत आजवर कायम धगधगत राहिलेला जम्मू काश्मीरचा प्रश्न निकाली काढण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारने सोमवारी संसदेत काश्मिरमधील कलम ३७० आणि कलम ३५ अ रद्द करण्याचा ऐतिहासिक प्रस्ताव मांडला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यासंदर्भात राज्यसभेत निवेदन दिले. दरम्यान, काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याच्या निर्णयाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही मंजुरी दिली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ३७० कलम हटवण्याचे विधेयक मांडताच विरोधी पक्षांनी थयथयाट केला. लडाखला काश्मीरपासून वेगळे करत केंद्रशासित प्रदेश करण्याच्या प्रस्ताव देखील मांडण्यात आला आहे. त्यामुळे लडाख आणि जम्मू काश्मीर हे आता केंद्रशासित प्रदेश असणार आहेत. ३७० च्या तरतुदी हटवल्यामुळे जम्मू काश्मीरला मिळणारे विशेषाधिकार कमी होणार आहेत.

घटनेतील ३७० कलम हटवण्याच्या मोदी सरकारच्या ऐतिहासिक निर्णयाचे हे आहेत फायदे

हा असेल जम्मू – काश्मीरच्या विकासाचा पर्याय ;भाजपने दिले उत्तर

भारताची अजून एक सुवर्णकन्या; कुस्तीत जिंकले सलग तिसरे सुवर्णपदक

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!