Share

IPL 2022 : दिलदार कॅप्टन..! रमणदीपला निरोप देताना रोहित शर्मा म्हणतो, “काही हवं असेल तर…”; पाहा VIDEO!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022)मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सला साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. मुंबई इंडियन्स हा या स्पर्धेचा सर्वात यशस्वी संघ आहे. आयपीएलच्या इतिहासात मुंबईने एकाच मोसमात १० सामने गमावण्याची आणि पॉइंट टेबलमध्ये शेवटच्या स्थानावर हंगाम संपवण्याची ही पहिलीच वेळ आहे. संघाचे सामने संपल्यानंतर खेळाडूंनी एकमेकांना निरोप दिला. यावेळी रोहितनेही सर्वांचा गूडबाय केले. संघाचा अष्टपैलू खेळाडू रमणदीप सिंगला जाता जाता त्याने एक संदेश दिला. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

मुंबई इंडियन्स आणि भारतीय संघाचा सध्याचा कर्णधार रोहित शर्मा मैदानाबाहेर नेहमी कूल आणि चांगल्या मूडमध्ये दिसतो. तो त्याच्या टीममेट्स आणि इतर लोकांना देखील मदत करण्यासाठी नेहमीच तयार असतो, याची सर्वांना जाणीव आहे. आयपीएल २०२२ मधील आव्हान संपुष्टात आल्यानंतर रमणदीप सिंगला निरोप देण्याची वेळ आली तेव्हा रोहितने त्याला म्हटले, “काळजी घे मित्रा. काही हवे असेल तर मला फोन कर.”

https://twitter.com/mipaltan/status/1528760165121630215?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1528760165121630215%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.cricketnmore.com%2Fcricket-news%2Fif-you-need-anything-call-me-says-rohit-sharma-to-young-ramandeep-singh-video-100403

या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. त्याने आयपीएल २०२२ मध्ये एकूण ४ सामने खेळले, ज्यामध्ये त्याने ६.२५च्या इकॉनॉमीने गोलंदाजी करताना ४ बळी घेतले आणि फलंदाजीत ३४ धावांचे योगदान दिले.

महत्त्वाच्या बातम्या –

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!