मुंबई : औरंगाबाद सभेनंतर राज ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहेत. औरंगाबाद सभेत मशिंदीच्या भोंग्यांबाबत राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा अल्टिमेटम दिला. त्याही आधी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर २ एप्रिल रोजी शिवाजी पार्कवर झालेल्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी ‘कोणत्याही धर्माच्या प्रार्थनेला माझा विरोध नाही, पण मशिदीवरील भोंगे खाली उतरावेच लागतील, जर भोंगा दिसलाच तर त्याच्या समोर दुप्पट आवाजात स्पीकर लावून हनुमान चालिसा लावणार,’ असा इशारा दिला होता. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यात कडक पोलीस बंदोबस्त तेवण्यात आला आहे.
औरंगाबाद येथे झालेल्या सभेतल्या भाषणाची सलग पाच तास चौकशी झाली आहे. त्याचा अहवाल डीजीपींकडे देण्यात आला आहे. सभेपूर्वी देण्यात आलेल्या नियमावलींचं उल्लंघन झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे, असं पोलिसांचं म्हणणं आहे. भाषणात तणाव निर्माण होईल अशी वक्तव्ये ही आहेत.
दरम्यान सांगलीतल्या जुन्या एका प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात वॉरंट जारी करण्यात आलं आहे. ६ एप्रिल रोजी हे अटक वॉरंट जारी करण्यात आलं होतं. मात्र अद्यापही त्यावर कारवाई का करण्यात आली नाही? असा प्रश्न आता न्यायालयाने पोलिसांसमोर उपस्थित केला आहे. सांगली जिल्ह्यातलं हे प्रकरण आहे. सांगली जिल्ह्यातल्या शिराळा कोर्टाकडून राज ठाकरेंना अटक करण्याबाबत वॉरंट जारी करण्यात आलं होतं. २८ एप्रिल २०२२ रोजी जारी करण्यात आलेलं हे पत्र आता समोर आलं आहे.
राज ठाकरेंवर १४३, १०९, ११७ अशी कलमं लावण्यात आली आहेत. २००८ सालच्या एका प्रकरणात राज ठाकरे यांच्या विरोधात हे अटक वॉरंट जारी करण्यात आलेलं आहे. यातली विशेष बाब म्हणजे राज ठाकरे यांच्या विरोधात जारी करण्यात आलेलं हे वॉरंट अजामीनपात्र आहे. त्यामुळे राज ठाकरेंना या वॉरंटमुळे कोणत्याही प्रकारचा जामीन मिळण्याची शक्यता नाही. सांगली जिल्ह्यातल्या शिराळ्यातील न्यायदंडाधिकाऱ्याने हे अटक वॉरंट जारी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :


