🕒 1 min read
मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील बुस्टर सभेत बाबरी मशीद पाडताना एकही शिवसैनिक उपस्थित नसल्याचा दावा केला होता. यावरच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी 1857 च्या लढ्यातही फडणवीसांचे मोठे योगदान असल्याचा टोला लगावला होता. यावरच भाजप नेत्या चित्रा वाघ (chitra wagh) यांनी ट्वीट करत आदित्य ठाकरेंना टोला लगावला आहे.
“१८५७ च्या उठावात पण फडणवीसांचे योगदान असेल इति आदित्य ठाकरे. बाकी बायकी टोमणे मारण्यात मुलगा बाप से बेटा सवाई दिसतोय.”, असा टोला चित्रा वाघ यांनी ट्वीट करत लगावला आहे.
१८५७ च्या उठावात पण फडणवीसांचे योगदान असेल ! इति आदित्य ठाकरे.
बाकी
बायकी टोमणे मारण्यात मुलगा बाप से बेटा सवाई दिसतोय…. pic.twitter.com/0ccxZ0sctE— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) May 3, 2022
दरम्यान १८५७ च्या लढ्यात त्यांचं खूप मोठं योगदान आहे. पण या गोष्टीत जाण्यापेक्षा, या वादात जाण्यापेक्षा राम मंदिर बाबत कोर्टाने निकाल चांगला दिला आहे. आता महाराष्ट्रासमोर बेरोजगारीचा प्रश्न उभा ठाकला आहे. त्यावर राजकीय पक्षांनी बोललं पाहिजे. चर्चा केली पाहिजे. असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले होते. यावर भाजपकडून अनेक प्रतिक्रिया आता उमटत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- IPL 2022 : विराट इज ऑन नॅशनल ड्युटी..! आयपीएल सुरू असताना करतोय ‘या’ गोष्टीची जय्यत तयारी; VIDEO व्हायरल!
- World Junior Weightlifting Championship : पुण्याच्या हर्षदा गरुडने ऐतिहासिक कामगिरी करत पटकावले सुवर्णपदक
- “स्वतःचा भाऊ मुख्यमंत्रीपदावर बसल्याचे पाहवत नसल्याने…”, विनायक राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
- IPL 2022 KKR vs RR : थोडक्यात बचावला बोल्ट..! राजस्थानच्या खेळाडूनं आपल्याच खेळाडूला मारला बॉल; पाहा VIDEO!
- “प्रत्येक निवडणुकीला सुपारी घेण्याची ‘मनसे’ची जुनी पद्धत”, शिवसेनेचा प्रहार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

