मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022)चा ४७ वा सामना कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स (KKR vs RR) यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने २० षटकांत ५ गडी गमावून १५२ धावा केल्या. उमेश यादवच्या षटकात राजस्थानला पहिला धक्का बसला. उमेश यादवने त्याच्याच गोलंदाजीवर आश्चर्यकारक झेल घेतला. हा झेल पाहून सर्वजण थक्क झाले.
राजस्थान रॉयल्सने सामन्यात संथ सुरुवात केली. पहिल्या २ षटकात संघाला कोणताही धक्का बसला नाही. उमेश यादव तिसरे षटक टाकत होता. षटकाच्या पहिल्या चेंडूवर देवदत्त पडिक्कलने सरळ शॉट खेळला. उमेशने हा फटका एका हाताने रोखला आणि शेवटी अप्रतिम झेल घेतला. त्याने ५ चेंडूत २ धावा केल्या. या मोसमात सर्वाधिक ३ शतके झळकावणारा जोस बटलर या सामन्यात मोठी खेळी खेळू शकला नाही. तो २५ चेंडूत २२ धावा काढून टिम साऊदीचा बळी ठरला. त्याने ३ चौकार मारले. चालू मोसमात त्याने ५८८ धावा केल्या आहेत.
हा अप्रतिम झेल पाहण्यासाठी येथे क्लिक करा
राजस्थान रॉयल्सचा संघ सध्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. या सामन्यापूर्वी त्यांनी ९ सामने खेळले असून ६ सामने जिंकले आहेत. दुसरीकडे, कोलकाता संघाला ९ पैकी ३ सामने जिंकण्यात यश आले आहे. ६ गुणांसह संघ सध्या आठव्या क्रमांकावर आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली केकेआरचा संघ गेल्या मोसमात अंतिम फेरीत पोहोचला होता, मात्र चालू मोसमात त्यांना आतापर्यंत आश्चर्यकारक कामगिरी करता आलेली नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

