Share

“…नाहीतर आम्हीही त्याच मैदानावर सभा घेऊ”, इम्तियाज जलील यांचा इशारा

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची १ मे रोजी औरंगाबद येथे सभा पार पडली. या सभेत राज ठाकरे यांनी शिवाजी महाराजांचा इतिहास, शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसमुळे सुरू झालेला जातीय द्वेष, मशिदीवरील भोंगे आणि इतर काही मुद्द्यांवर भाष्य केले. दरम्यान, राज ठाकरेंच्या भाषणानंतर राजकीय वर्तुळात आता पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर बोलत असतांना राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करा नाहीतर आम्हीही त्याच मैदानावर सभा घेऊ, असा इशारा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी दिला आहे.

यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना इम्तियाझ जलील म्हणाले की,‘आज देशामध्ये ज्याप्रकारे मुस्लिमांना टार्गेट करण्यात येत आहे, गोरगरीब मुस्लिमांचे घरं पाडण्यात येत आहे. याच्यासाठी मी प्रार्थना केली आहे. दुर्दैव हे आहे की मागील काही वर्षांमध्ये देशामध्ये समाजा-समाजामध्ये जाती-जातींमध्ये कश्याप्रकारे तेढ निर्माण करण्यात येईल. यासाठी भाजप,शिवसेना असो, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे असुद्या ह्या सर्व लोकांचे प्रयन्त सुरु आहेत.’

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘आम्ही पोलिसांच्या कारवाईची वाट बघत आहोत. नियम सर्वांसाठी समान आहेत. पोलिसांनी कठोर कारवाई नाही केली तर तुम्ही हे लिहून घ्या राज ठाकरेंपेक्षा जास्त पब्लिक मी आणणार आणि ज्या भाषेत ते बोलले त्यापेक्षा चांगली भाषा मी वापरणार आणि जर त्यांच्यावर आता कारवाई केली नाही तर मग पोलिसांना माझ्यावरही कारवाई करण्याचा अधिकार राहणार नाही’, असेही जलील म्हणाले.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!