Share

Devendra Fadnavis | महाराष्ट्र पुढील दोन वर्षांत गुजरातच्या पुढे जाईल – देवेंद्र फडणवीस

Published On: 

मुंबई :  महाराष्ट्र राज्यातील राजकीय वातावरण सध्या खूप जास्त गढूळ झालं आहे. त्यात महाराष्ट्रात येणारा वेदांत प्रकल्पही गुजरातला गेल्यामुळे, विरोधी पक्षनेते सत्तधारी पक्षनेत्यांवर आरोप, टीका करताना दिसून येतं आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवसी यांनीही विरोधकांवर निशाणा साधला आहे.

देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य –

आमच्या सरकारच्या काळात आम्ही अनेक योजना सुरू केल्या आणि निर्णय घेतले गेल्याने 2013 मध्ये परकीय गुंतवणुकीत पाचव्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आला. मात्र गेल्या दोन वर्षांत राज्याने पहिला क्रमांक गमावला आणि गुजरात पहिल्या क्रमांकावर गेलं, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लक्ष्य केलं आहे. काल लघुउद्योग भारतीच्या प्रदेश आधिवेशनात फडणवीस बोलत होते.

महाराष्ट्र राज्य गुजरातच्या पुढे जाईल –

गुजरात म्हणजे पाकिस्तान नाही, लहान भाऊच आहे. आपल्यात निकोप स्पर्धा असून महाराष्ट्र गुजरातलाच नव्हे, तर कर्नाटकलाही मागे टाकणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी सांगितले. पुढे बोलताना ते असंही म्हणाले की, पुढील दोन वर्षांत महाराष्ट्र राज्य गुजरातच्या पुढे जाऊन देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य होईल.

तसेच कोकणातील तेलशुद्धीकरण प्रकल्प आणि वाढवण बंदर हे दोन्ही प्रकल्प राज्य सरकार मार्गी लावणार असून त्याद्वारे राज्य दहा वर्षे पुढे जाईल, असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!