Share

Gulabrao Patil | “अजित पवार आम्हाला गद्दार म्हणाले ते आम्हाला मान्य, पण…”, गुलाबराव पाटील

Published On: 

जळगाव : शिवसेनेतील चालीस आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर आमदार आणि महाविकास आघाडी नेते एकमेकांवर वारंवार टीका करताना दिसत आहेत. अशातच शिवसेना पक्षाचे कट्टर असलेले गुलाबराव पाटील यांच्यावर काल विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी जोरदार टीका केली होती. यावरच आता गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

गुलाबराव पाटील यांचं अजित पवार यांना उत्तरः

जळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या एका मेळाव्यामध्ये गुलाबराव पाटील यांनी अजित पवारांना प्रत्युत्तर केलं आहे. अजित पवार हे विरोधी पक्ष नेते, टीका करणं त्यांचं काम आहे. मात्र, पवार यांनीही सकाळचा शपथविधी केला होता. मग, आम्ही पण त्यांना गद्दार म्हणायचं का?, असा सवाल गुलाबराव आणि उपस्थित केला आहे.

या सरकारने शेतकऱ्यांना मदत केली, साडेतीनशे कोटी रुपये जळगाव जिल्ह्यासाठी मिळालेः

या सरकारने शेतकऱ्यांना मदत केली, साडेतीनशे कोटी रुपये जळगाव जिल्ह्यासाठी मिळाले, हे त्यांनी मान्य करायला पाहिजे. मात्र त्यांनी आम्हाला गद्दार म्हटलं, हे आम्हाला मान्य आहे, पण अजित पवार ही विरोधी पक्ष नेते आहेत, सरकारच्या चांगल्या व वाईट, अशा दोन्ही गोष्टी सांगण्याची जबाबदारी त्यांची असल्याचं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीचे प्रॉपर उमेदवारच ठरत नाहीयेत, मतदारसंघही ठरलेला नाहीये, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये अजून त्यांची युती पक्की झालेली नसून आमदारकीच्या निवडणुकीत कोण? आगामी विधानसभेतीलही पक्ष महाविकास आघाडी लढवतील, असा आपल्याला वाटत नसल्याचे गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!